World Pneumonia Day : जागतिक न्यूमोनिया दिन का पाळला जातो? काय आहे महत्त्व?

न्यूमोनिया या आजाराबद्दल लोकांमध्ये जागरूकता निर्माण करण्यासाठी दरवर्षी १२ नोव्हेंबर या दिवशी जागतिक न्यूमोनिया दिवस साजरा केला जातो.

59
World Pneumonia Day : जागतिक न्यूमोनिया दिन का पाळला जातो? काय आहे महत्त्व?
World Pneumonia Day : जागतिक न्यूमोनिया दिन का पाळला जातो? काय आहे महत्त्व?

न्यूमोनिया हा एक गंभीर आजार आहे. न्यूमोनिया हा बहुतांश लहान मुलांना होतो. पण तरीही हा आजार कोणालाही होऊ शकतो. न्यूमोनियामुळे फुफ्फुसाचा संसर्ग होतो. या आजारामुळे रुग्णाला श्वास घ्यायला त्रास होतो. न्यूमोनियावर वेळीच योग्य उपचार नाही केले, तर तो गंभीर स्वरूप घेऊ शकतो. न्यूमोनिया या आजाराबद्दल लोकांमध्ये जागरूकता निर्माण करण्यासाठी दरवर्षी १२ नोव्हेंबर या दिवशी जागतिक न्यूमोनिया दिवस (World Pneumonia Day) साजरा केला जातो.

या प्रसंगी जागतिक स्तरावर वेगवेगळ्या प्रकारचे कार्यक्रम, आरोग्य शिबिरे आणि चर्चासत्रे आयोजित केली जातात. जागतिक न्यूमोनिया दिनानिमित्त आम्ही तुम्हाला या लेखामध्ये न्यूमोनिया या आजाराबद्दल सांगणार आहोत.

न्यूमोनिया हा आजार जडल्यानंतर रुग्णाला योग्य वेळेत काही उपायांचा अवलंब करून आणि काही ठराविक औषधं देऊन त्याला गंभीर स्वरूप घेण्यापासून रोखू शकतो. मात्र न्यूमोनिया झाल्यानंतर योग्य वेळी योग्य उपचार घेण्यास थोडासाही हलगर्जीपणा केला तर, ह्या आजाराचं गंभीर स्वरूपात रूपांतर होऊ शकतं आणि रुग्णाचा मृत्यूही होऊ शकतो. न्यूमोनिया या आजाराबद्दल समाजात जागरूकता निर्माण व्हावी, लोकांनी योग्य वेळीच न्यूमोनियाची लक्षणं ओळखवीत, त्या आजारावर लगेचच डॉक्टरांच्या सल्ल्याने योग्य उपचार सुरू करावेत, हाच जागतिक न्यूमोनिया दिन (World Pneumonia Day) साजरा करण्यामागचा मुख्य हेतू आहे.

(हेही वाचा – पंतप्रधानांच्या सभेसाठी काढले शिवतीर्थावरील दीपोत्सवाचे कंदिल; Raj Thackeray यांचा संताप)

न्यूमोनिया हा एक श्वसनाचा गंभीर आजार आहे. न्यूमोनिया या आजारामुळे रुग्णाच्या फुफ्फुसात संसर्ग होतो. फुफ्फुसात संसर्ग झाल्यामुळे न्यूमोनिया हा आजार जडलेल्या व्यक्तीला श्वास घेण्यास त्रास होतो आणि छातीत वेदना होतात. इतकंच नाही, तर गंभीर प्रकरणांमध्ये न्यूमोनिया या आजारामुळे फुफ्फुसात पाणीही भरू शकतं. या आजारावर योग्य वेळीच उपचार नाही केले, तर रुग्णाचा मृत्यू होऊ शकतो.

न्यूमोनियाची लक्षणं सौम्य ते गंभीर स्वरूपाची असू शकतात. न्यूमोनिया या आजाराचा उपचार हा रुग्णांमध्ये दिसून येणाऱ्या लक्षणांवर अवलंबून असतो. न्यूमोनियाची सामान्य लक्षणं पुढे नमूद केलेली आहेत.

(हेही वाचा – Maharashtra Assembly 2024 : राज्यात प्रचाराचा धुरळा, पंतप्रधान मोदींच्या ३, तर राहुल गांधींच्या २ सभा होणार!)

  • श्वास घेताना किंवा खोकताना छातीत दुखणं
  • थकवा येणं
  • ताप, घाम आणि थंडी वाजून येणं
  • शरीराचं तापमान सामान्य तापमानापेक्षा कमी होणं
  • मळमळ, उलट्या किंवा अतिसार होणं
  • श्वास घेण्यात अडचण येणं

नवजात शिशूंमध्ये वर नमूद केलेल्या लक्षणांपैकी कोणतीही लक्षणं दिसली, तर ताबडतोब आपल्या बालरोगतज्ञांचा सल्ला घ्या.

हेही पहा –

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.