Dabur India Limited : सेवाव्रतातून जन्न झालेली डाबर इंडिया कंपनी

डाबरचे संस्थापक एस के बर्मन हे पेशाने डॉक्टर होते.

69
Dabur India Limited : सेवाव्रतातून जन्न झालेली डाबर इंडिया कंपनी
Dabur India Limited : सेवाव्रतातून जन्न झालेली डाबर इंडिया कंपनी
  • ऋजुता लुकतुके

पेशाने डॉक्टर असलेल्या एका बंगालमधील तरुणाने डॉक्टरी सेवा लोकांच्या घरापर्यंत पोहोचावी यासाठी सेवाव्रत म्हणून सुरू केलेली डाबर हेल्थकेअर कंपनी आता देशातील एक अग्रगण्य ग्राहकोपयोगी वस्तूंची उत्पादक कंपनी बनली आहे. पण, या कंपनीची सुरूवात चक्क १८८४ मध्ये झाली आहे. तेव्हा संस्थापक एस के बर्मन हे फक्त २८ वर्षांचे होते. पेशाने डॉक्टर असलेले बर्मन तळागाळातील आणि खेड्यापाड्यातील लोकांना वैद्यकीय उपचार कमी पैशात कसे मिळतील याचा विचार करत होते. कॉलरा, मलेरिया आणि प्लेगने तेव्हा लोकांचे जीव जात होते. आणि बर्मन यांनी अगदी मिशिनरी दृष्टिकोण ठेवून या औषधांवरील उपचार आणि गोळ्या लोकांपर्यंत कसे पोहोचतील यासाठी प्रयत्न सुरू केले. (Dabur India Limited)

तिथून सुरूवात झाली डाबर हेल्थकेअरची. सुरुवातीला बर्मन यांचा हेतू तळागाळातील लोकांपर्यंत पोहोचण्याचाच होता. त्यांनी आयुर्वेदिक औषधं तयार करून त्याचा प्रसार सुरू केला. पैसे मिळवणं हा पहिला हेतू नव्हताच. पण, घरपोच औषधं देणारा हा ‘डाक्टर’ लोकांमध्ये प्रसिद्घ झाला. देशी भाषेत डॉक्टरचं डाक्टर झालं. आणि डाक्टर बर्मन बंगालमध्ये प्रसिद्घ झाले. या डाक्तर बर्मनचं पुढे डाबर झालं. म्हणजेच डाक्तर बर्मन यांनी दिलेली औषधं. पुणे बर्मन यांनी या उद्योगाला व्यवसायाचं स्वरुप दिलं तेव्हा त्यांनी हेच डाबर नाव उचललं. (Dabur India Limited)

(हेही वाचा – Assembly Election 2024: लालपरी विधानसभा निवडणुकीसाठी सज्ज; ९ हजार बस निवडणूक कर्तव्यावर!)

पण, पुढे कंपनीत अनेक बदल होत गेले. देशातील पहिल्या काही उद्योजक घराण्यातील हे घराणं आहे. आणि त्याचबरोबर उद्योगाच्या व्यवस्थापनापाला कायदेशीर स्वरुप देऊन बर्मन कुटुंबीयांची मिळकत सुरक्षित करणारंही हे पहिलं घराणं आहे. त्यामुळे डाबर ही कुटुंबाची मुख्य कंपनी असली तरी बर्मन कुटुंबीयांनी पुढे जाऊन अनेक उद्योगांमध्ये मोठी गुंतणूक केली. आणि त्यामुळे डाबरचा विस्तार हेल्थकेअर पासून ते अगदी वित्तीय सेवा, मीडिया, शिक्षण, क्रीडा अशा सगळ्या क्षेत्रात झाला आहे.

बर्मन यांच्या कुटुंबीयांनी नंतर कंपन्यांमध्ये थेट कारभार करणं टाळलं. आणि त्यांनी बर्मन कुटुंबीयांची एक परिषद बनवली. ही परिषद डाबर कंपन्यांवर लक्ष ठेवून असते. पण, प्रत्यक्ष कामकाजात ढवळाढवळ करत नाही. एक प्रकारे टाटा सन्सने टाटा ट्रस्टकडे कारभार सोपवलाय तसाच हा प्रकार आहे. फक्त या परिषदेत बर्मन कुटुंबीयांचाच समावेश आहे. बर्मन कुटुंबीयांची पाचवी पिढी असलेला आदित्य बर्मन (Aditya Burman) सध्या या परिषदेतील मुख्य चेहरा आहे. (Dabur India Limited)

हेही पहा –

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.