Virat Kohli : विराट कोहलीचा शेवटचा ऑस्ट्रेलियन दौरा? ऑस्ट्रेलियन मीडियात चर्चा

Virat Kohli : विराट कोहली सध्या खराब फॉर्मशी झुंजतोय. 

64
Virat Kohli : विराट कोहलीचा शेवटचा ऑस्ट्रेलियन दौरा? ऑस्ट्रेलियन मीडियात चर्चा
  • ऋजुता लुकतुके

भारताचा स्टार फलंदाज विराट कोहली (Virat Kohli) आपल्या कारकीर्दीच्या शेवटच्या टप्प्यात आहे आणि गोष्ट तो स्वत:ही अमान्य करणार नाही. पण, अलीकडे त्याचा कसोटीतील फॉर्म हरवलाय आणि ही काळजीची गोष्ट आहे. त्याच्या फॉर्ममुळे आगामी ऑस्ट्रेलिया दौरा हा कदाचित त्याच्यासाठी शेवटची कसोटी मालिका असू शकेल असा सूर मीडियात ऐकू येवू लागला आहे. त्या बाबतीत अजून स्पष्टता नसली तरी ऑस्ट्रेलियान मीडियाने हा विराटचा शेवटचा ऑस्ट्रेलिया दौरा असल्याचं चित्र रंगवायला सुरूवात केली आहे.

भारतासाठी ही विराटला (Virat Kohli) अखेरची मानवंदना देणारी मालिका असेल, असं या मालिकेचं वर्णन ऑस्ट्रेलियात केलं जात आहे. ‘या उन्हाळ्यात भारताचा दिग्गज फलंदाज विराट कोहलीला या किनाऱ्यावर अखेरची मानवंदना दिली जाईल,’ असं द सन हेराल्डने म्हटलं आहे. तर या मालिकेत यशस्वी जयस्वालवर लक्ष ठेवावं लागेल, असाही त्यांचा होरा आहे. २०२४ हे वर्ष विराट कोहलीला तितकंसं चांगलं गेलेलं नाही.

(हेही वाचा – Border-Gavaskar Trophy 2024 : ऑस्ट्रेलियातील सराव सामना रद्द करण्यावरून गावस्करांनी टोचले भारतीय संघाचे कान)

तीनही प्रकारचं क्रिकेट धरुन त्याने २५ डावांमध्ये मिळून फक्त ४८८ धावा केल्या आहेत आणि त्याची सरासरी आहे जेमतेम २० धावांची. तर कसोटीमधील कामगिरी बद्दल बोलायचं झालं तर बांगलादेश आणि न्यूझीलंड विरुद्घच्या ५ कसोटींमध्ये १० डावांत त्याने फक्त १९२ धावा केल्या आहेत. ऑस्ट्रेलिया दौऱ्यात आता विराटची बॅट परजेल का हा खरा प्रश्न आहे. एरवी ऑस्ट्रेलियात, ऑस्ट्रेलिया विरुद्ध विराटची बॅट नेहमी चमकली आहे आणि आतापर्यंत इथं त्याने दोन मालिकांमध्ये मिळून १,३०० च्या वर धावा केल्या आहेत. भारताला ऑस्ट्रेलियातील दोन बोर्डर-गावस्कर मालिका जिंकून देण्यात विराटचा (Virat Kohli) मोठा वाटा आहे. त्यामुळे या मालिकेत त्याच्या फलंदाजीला नवसंजीवनी मिळावी, अशी इच्छा चाहते व्यक्त करत आहेत.

या मालिकेच्या तयारीसाठी विराट कोहली (Virat Kohli) उर्वरित संघाच्या एक दिवस आधी ऑस्ट्रेलियात पोहोचला आहे. सन हेराल्डने २०१२ च्या मालिकेचा हवाला देताना विराट नावाचं वादळ ऑस्ट्रेलियात अवतरलं अशी आठवणही दिली आहे. ‘२०१२ मध्ये प्रेक्षकांनी हूर्यो उडवल्यावर त्यांना मधलं बोट दाखवण्याची हिंमत एका तरुणाने दाखवली होती आणि दोन कसोटींनंतर या तरुणाने मालिकेतील भारतासाठीचं एकमेव शतक झळकावून आपण मैदान गाजवायला आलो आहोत, असं दाखवून दिलं होतं. पुढचं दशक त्याने भारत-ऑस्ट्रेलिया मालिकेतील द्वंद्व जिवंत ठेवलं. आता त्याची जागा धेण्यासाठी यशस्वी जयसवाल सज्ज झाल्याचं दिसतंय,’ असं सन हेराल्डने म्हटलं आहे.

हेही पहा –

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.