- प्रतिनिधी
काँग्रेसचे अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांनी उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांची तुलना दहशतवाद्यांशी केल्याने जोरदार वाद सुरु झाला आहे. त्यामुळे काँग्रेसचे माजी नेते आचार्य प्रमोद कृष्णम (Acharya Pramod Krishnam) म्हणाले खरगे नावाने हिंदू आहेत, त्यांचे कर्म मात्र अजिबात हिंदूसारखे नाहीत.
(हेही वाचा – Assembly Election 2024: लालपरी विधानसभा निवडणुकीसाठी सज्ज; ९ हजार बस निवडणूक कर्तव्यावर!)
आचार्य प्रमोद कृष्णम (Acharya Pramod Krishnam) म्हणाले की, मल्लिकार्जुन खरगे त्यांच्या नावावरून हिंदू वाटतात पण त्यांच्या कृतीतून ते हिंदू आहेत असे वाटत नाही. त्यांनी आधी ते कोण आहेत, हे स्पष्ट करावे. तरच त्यांना हिंदू वर बोलण्याचा अधिकार आहे. कारण अशा प्रकारे कोणीही संत आणि माहात्मे यांचा अपमान करत नाही. यांच्या बोलण्यावरून असे दिसते की, ते सनातन धर्मावर चिडले आहेत आणि सनातनवर बोलण्याचा त्यांना काही अधिकार आहे असे आपल्याला वाटत नाही.
(हेही वाचा – Virender Sehwag : विरेंद्र सेहवागने कारकीर्दीत किती षटकार ठोकले?)
जे सनातनच्या विरोधात आहे, ती भारताच्या विरोधात आहे. खरगे इतके ज्येष्ठ नेते आहेत की, मुख्यमंत्र्यांचा अपमान करणे त्यांना शोभत नाही, हा ऋषिप्रधान देश आहे. त्यामुळे येथे हिंदू सनातनचा अपमान करणार नाहीत, योगीवरील खालच्या स्वरावरील टीका खरगे यांना शोभणारी नाही. बटेंगे तो कटेंगे या योगी यांच्या विधानावर खरगे यांनी योगींवर कडक टीका केली होती.
हेही पहा –
Join Our WhatsApp Community