Assembly Election साठी एसटीच्या ९ हजार बस तैनात

75
Assembly Election साठी एसटीच्या ९ हजार बस तैनात

महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीच्या (Assembly Election) पार्श्वभूमीवर महाराष्ट्र राज्य रस्ते परिवहन महामंडळाने (एसटी) निवडणूक आयोगाला आणि पोलिस प्रशासनाला ९२३२ बस उपलब्ध करून देण्याचा निर्णय घेतला आहे. या बस १९ आणि २० नोव्हेंबर रोजी प्रासंगिक करारावर देण्यात येणार असून, या कालावधीत निवडणूक साहित्य आणि मतदान यंत्रांची वाहतूक करण्याचे महत्त्वपूर्ण काम या बसद्वारे केले जाणार आहे.

निवडणूक आयोगाने मतदान केंद्रांवर मतदान यंत्रे पोहोचवण्यासाठी आणि मतदानानंतर मतमोजणी केंद्रांवर ते परत नेण्यासाठी ८९८७ बसची मागणी केली होती. याशिवाय २४५ अतिरिक्त बस पोलिस प्रशासनासाठी देखील उपलब्ध करून देण्यात येणार आहेत. त्यामुळे निवडणूक काळात पोलिस यंत्रणेला पुरेसा वाहतूक आधार मिळेल. (Assembly Election)

(हेही वाचा – मविआचे महिलांना ३ हजार रुपये महिना देण्याचे आश्वासन; Ajit Pawar यांनी मांडला हिशेब, म्हणाले…)

प्रशासनाच्या माहितीनुसार, बसची मागणी ठरावीक कालावधीसाठी आहे. त्यामुळे या प्रासंगिक कराराचा नियमित प्रवासी वाहतुकीवर परिणाम होणार नाही. त्यामुळे रोजच्या प्रवाशांना कोणत्याही अडचणीचा सामना करावा लागणार नाही. एसटीकडे सध्या स्वत:च्या एकूण १३,३६७ बस आहेत. त्यांपैकी ९२३२ बस राज्यातील विविध ३१ विभागांतून निवडणुकीच्या कामासाठी तैनात केल्या जातील. मुंबईसह संपूर्ण राज्यात यासाठी व्यवस्थापन केले जाईल. (Assembly Election)

या तात्पुरत्या करारामुळे एसटी महामंडळाला मोठा आर्थिक लाभ होण्याची अपेक्षा आहे. मागील लोकसभा निवडणुकीत देखील अशा प्रकारे करारावर बस पुरवण्यात आल्या होत्या. त्यावेळी एका बससाठी २४ ते ३० हजार रुपये भाडे मिळाले होते. विधानसभा निवडणुकीतही (Assembly Election) असेच भाडे मिळण्याची शक्यता असल्याने, या करारामुळे एसटी महामंडळाला अर्थिक फायदा होईल.

हेही पहा –

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.