Mumbai University ची आशिया रँकिंगमध्ये दमदार झेप; ६७ वरून ५२ क्रमांकावर

265
Mumbai University ची आशिया रँकिंगमध्ये दमदार झेप; ६७ वरून ५२ क्रमांकावर

मुंबई विद्यापीठाने (Mumbai University) क्यूएस आशिया युनिव्हर्सिटी रँकिंग २०२५ मध्ये उल्लेखनीय प्रगती साधत ६७ वरून थेट ५२ क्रमांकावर झेप घेतली आहे. जागतिक क्रमवारीतही विद्यापीठाने २९१-३०० रँकिंग बँडमधून २४५ व्या स्थानी पोहोचत गुणवत्ता सुधारली आहे. या यशामुळे मुंबई विद्यापीठ आशियातील उच्च शिक्षण संस्थांमध्ये आपले महत्त्वपूर्ण स्थान बजावू लागले आहे.

क्वाकरेली सायमंड्स (QS) च्या अहवालानुसार, मुंबई विद्यापीठाने (Mumbai University) धोरणात्मक सुधारणांना प्राधान्य देत, संस्थात्मक प्रतिष्ठा, रिसर्च आऊटपूट, वैश्विक सहभागिता यासह इतर निकषांमध्ये विशेष कामगिरी केली आहे. विद्यापीठाने यंदा १९ वरून ३४ एकूण गुण मिळवत आपला दर्जा अधिक भक्कम केला आहे.

(हेही वाचा – बॅगच्या तपासणीवरून Uddhav Thackeray यांचा पुन्हा थयथयाट; काय आहे निवडणूक आयोगाचा नियम)

मुंबई विद्यापीठाने (Mumbai University) पेपर्स पर फॅकल्टी या निकषात ९०.६ गुण मिळवत सर्वाधिक प्रगती साधली आहे. त्यानंतर नियोक्ता प्रतिष्ठा ६४.१, शैक्षणिक प्रतिष्ठा ३४.६, आंतरराष्ट्रीय विद्यार्थी गुणोत्तर ३२.६, आंतरराष्ट्रीय संशोधन नेटवर्क २१.३ आणि इतर महत्त्वाच्या निकषांमध्ये उल्लेखनीय कामगिरी दर्शवली आहे. तसेच, विद्यापीठाने इनबाऊंड आणि आऊटबाऊंड एक्सचेंज स्टुडेंट कॅटेगरीमधील आपले मागील स्तर टिकवले आहे.

मुंबई विद्यापीठाचे (Mumbai University) कुलगुरु प्रा. रवींद्र कुलकर्णी यांनी सांगितले की, विद्यापीठाच्या सर्व घटकांनी संशोधन व विकासाच्या दिशेने सातत्याने केलेल्या प्रयत्नांचे हे फलित आहे. भविष्यात सायटेशन पर पेपर आणि स्टुडेंट एक्सचेंज प्रोग्राममध्ये आणखी सुधारणा करण्याच्या दृष्टीने विद्यापीठ प्रयत्नशील राहणार असल्याचे त्यांनी नमूद केले.

हेही पहा –

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.