रत्नागिरीतून १३ Bangladesh मुस्लिम घुसखोरांना अटक

109

रत्नागिरी जिल्हा सध्या विविध प्रकरणी तणावग्रस्त प्रकरणात आहे. याठिकाणी लव्ह जिहाद प्रकरणी घडली आहेत, आता जिल्ह्यात 13 बांगलादेशी (Bangladesh) मुस्लिम घुसखोरांना अटक करण्यात आल्याची घटना समोर आली आहे. दहशतवाद विरोधी पथकाने मंगळवारी, १२ नोव्हेंबर रोजी पहाटे साडेतीन वाजण्याच्या सुमारास त्यांना अटक केली. रत्नागिरी तालुक्यातील नाखरे-कालरकोंडवाडी येथे ही कारवाई करण्यात आली.

पोलिसांनी वहिद रियाज सरदार, रिजाउल हुसेन करीकर, शरिफूल हौजीआर सरदार, फारुख महंमद जहीरअली मुल्ला, हमिद मुस्तफा मुल्ला, राजु अहमद हजरतली शेख, बाकिबिल्लाह अमीर हुसेन सरदार, सैदूर रेहमान मोबारक अली, आलमगिर हूसेन हिरा सन ऑफ अब्दुल कादर दलाल, मोहम्मद शाहेन सरदार सन ऑफ समद सरदार, मोहम्मद नुरुझमान मोरोल सन ऑफ बलायत अली, मोहम्मद नुरहसन सरदार सन ऑफ मोहम्मद जहर सरदार, आणि मोहम्मद लालूट मोंडल सन ऑफ किताब अली अशा अटक केलेल्या बांगलादेशी (Bangladesh) मुसलमानांची नावे आहेत. त्यांच्या विरोधात दहशतवाद विरोधी शाखेचे पोलीस नाईक रत्नकांत शिंदे यांनी तक्रार दिली आहे.

(हेही वाचा मविआचे महिलांना ३ हजार रुपये महिना देण्याचे आश्वासन; Ajit Pawar यांनी मांडला हिशेब, म्हणाले…)

त्यानुसार, संशयित १३ बांगलादेशी घुसखोर जून २०२४ पासून आतापर्यंत वैध कागदपत्रांशिवाय तसेच भारत-बांगलादेशी सीमेवरील मुलखी अधिकाऱ्यांच्या लेखी परवानगीशिवाय भारतात अवैधरित्या प्रवेश करुन आसिफ सावकार (रा. पावस बाजारपेठ, रत्नागिरी) याच्या नाखरे ग्रामपंचायती हद्दीतील कालरकोंडवाडी येथील चिरेखाणीवर वास्तव्य करताना आढळून आले. त्यांच्या विरोधात पारपत्र भारतात प्रवेश नियम १९५० चा नियमासह ६, परकिय नागरिक आदेश १९४८ परि. ३(१) (अ), परकीय नागरिक कायदा १९४६ चे कलम १४ प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याप्रकरणी पोलीस अधिक तपास करीत आहेत. (Bangladesh)

 

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.