Champions Trophy 2025 : चॅम्पियन्स करंडकातून पाकिस्तानच माघार घेण्याची शक्यता

Champions Trophy 2025 : चॅम्पियन्स करंडकाविषयीचा गोंधळ अजूनही सुरूच आहे.

86
Champions Trophy 2025 : पाक क्रिकेट मंडळाने हायब्रीड मॉडेलचा पर्याय नाकारला?
  • ऋजुता लुकतुके

एकीकडे आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषद भारताच्या हायब्रीड मॉडेलच्या प्रस्तावार पाकचं काय उत्तर येतं याच्या प्रतीक्षेत आहे. तर पाक क्रिकेट मंडळाने भारताच्या समस्येवर तोडगा काढण्याची विनंती पाकिस्तान सरकारला केली आहे आणि त्यातच नवीन अपडेट म्हणजे स्पर्धेच्या आयोजनातून डोकं काढून घेण्याची भूमिका आता पाक क्रिकेट मंडळाने घेतल्याचं समजतंय. भारतीय संघाने पाकिस्तानला येण्यासाठी नकार दिल्यामुळे सध्या स्पर्धेचं भवितव्यच अधांतरी झालं आहे. (Champions Trophy 2025)

(हेही वाचा – Jannik Sinner : यानिक सिनरला २०२४ चा एटीपी चषक)

नुकताच, या स्पर्धेचा ११ नोव्हेंबरला प्रस्तावित असलेला लाहोरचा एक कार्यक्रम आयसीसीने रद्द केला आहे. त्यामागेही स्पर्धेविषयीची अनिश्चितता हेच कारण होतं. त्यातच आता पाक बोर्डाचा आताचा पवित्रा बघता स्पर्धेवरील अनिश्चिततेचे ढग वाढलेले दिसत आहेत. दरवर्षी एकतरी आयसीसी करंडक असलेली स्पर्धा हवी म्हणून आयसीसीने आग्रहाने चॅम्पियन्स करंडक स्पर्धा सुरू ठेवली आहे. टी-२० विश्वचषक ही द्वैवार्षिक होणारी स्पर्धा, एकदिवसीय विश्वचषक ही चार वर्षांतून एकदा होणारी स्पर्धा आणि यामध्ये येणारी कसोटी अजिंक्यपदाची अंतिम फेरी अशा तीन स्पर्धा आयसीसीकडून आयोजित करण्यात येतात आणि ४ वर्षांच्या या कालावधीत एक वर्ष हे चॅम्पियन्स करंडकासाठी राखून ठेवण्यात आलं आहे. एकदिवसीय विश्वचषकातील अव्वल ८ संघांमध्ये ही स्पर्धा भरवण्यात येते. (Champions Trophy 2025)

(हेही वाचा – उबाठाच्या उमेदवाराचे उर्दूत पत्र; खान हवा की बाण हवा – Raj Thackeray यांचा प्रश्न)

यंदा २०२५ च्या फेब्रुवारीत ही स्पर्धा पाकिस्तानमध्ये अपेक्षित आहे. पण, त्यावरूनच गोंधळ उडाला आहे. भारताने सुरक्षेच्या कारणास्तव आपला संघ पाकिस्तानला पाठवायला नकार दिला आहे. तर पाकिस्तानमधील शहरांमध्ये असलेलं धुरकं प्रदूषणयुक्त असल्यामुळेही आयसीसी थोडी साशंक आहे. अशावेळी स्पर्धेच्या वेळापत्रकाविषयी निर्णयच होऊ शकत नाहीए. भारताने आपले सामने पाकिस्तान बाहेर खेळवण्याचा प्रस्ताव ठेवला आहे. आशिया चषकासाठी गेल्यावर्षी हेच मॉडेल वापरण्यात आलं होतं. पण, त्यामुळे अगदी अंतिम सामनाही पाकबाहेर खेळवावा लागू शकतो. त्यामुळे या मॉ़डेलमध्ये मोठं आर्थिक नुकसान असल्याचं सांगत पाकिस्तानने अजून हायब्रीड मॉडेलला मान्यता दिलेली नाही आणि गोंधळात भर म्हणून आता चॅम्पियन्स करंडकातून अंग काढून घेण्याची चर्चा सुरू झाली आहे. (Champions Trophy 2025)

हेही पहा –

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.