महायुतीचे उमेदवार Mihir Kotecha यांच्या जीवाला धोका; निवडणूक आयोगाने घेतली दखल

125
महायुतीचे उमेदवार Mihir Kotecha यांच्या जीवाला धोका; निवडणूक आयोगाने घेतली दखल
  • प्रतिनिधी 

मुलुंड विधानसभा निवडणुकीच्या रिंगणात उतरलेले महायुतीचे अधिकृत उमेदवार मिहीर कोटेचा (Mihir Kotecha) यांनी आपल्या जीवाला धोका असल्याची तक्रार निवडणूक आयोगाकडे केल्याने एकच खळबळ उडाली होती. मुख्य निवडणूक आयोगाने कोटेचा (Mihir Kotecha) यांच्या तक्रारीची दखल घेत त्यांना अतिरिक्त सुरक्षा पुरवण्याचा आदेश मुंबई पोलिसांना एका पत्रकाद्वारे देण्यात आला आहे. विधानसभा निवडणुकीच्या अनुषंगाने मुलुंड विधानसभा मतदारसंघातील भाजपा महायुतीचे उमेदवार मिहीर कोटेचा यांनी महाराष्ट्राचे मुख्य निवडणूक अधिकारी (सीईओ) एस. चोक्कलिंगम यांना तीन अज्ञात लोकांकडून त्यांच्या सुरक्षेचा भंग करण्याचा आणि त्यांच्या जीवाला हानी पोहोचवण्याचा प्रयत्न केल्याबद्दल पत्र लिहिले होते. यामागे आपले विरोधक असल्याचे सांगत कोटेचा यांनी याप्रकरणी कठोर कारवाईची मागणी केली, तसेच आपला जीव धोक्यात घालणारे असल्याचे सांगून कोटेचा (Mihir Kotecha) यांनी या तिघांवर कठोर कारवाई व तपास करून त्यांचे हेतू जाणून घेण्याची मागणी निवडणुक आयोगाला पत्र लिहून केली होती.

(हेही वाचा – दिवाळी, छट पूजा उत्सवानिमित्त Central Railway च्या ७४० विशेष ट्रेन सेवा)

मुख्य निवडणूक अधिकाऱ्यांना लिहिलेल्या पत्रात कोटेचा (Mihir Kotecha) यांनी शुक्रवारी प्रचार संपल्यानंतर मुलुंड (पश्चिम) येथील एका हॉटेलमध्ये त्यांच्या कार्यकर्त्यासोबत जेवणासाठी गेले होते. दरम्यान पांढऱ्या रंगाच्या वॅगनआर या कारमध्ये तीन संशयास्पद व्यक्ती तेथे आल्या. त्यांनी कोटेचा यांच्या सुरक्षा गार्डला सांगितले की, कोटेचा यांनी त्यांना फोन करून भेटायला बोलावले आहे. माझ्या सुरक्षा रक्षकांनी चौकशी केली तेव्हा त्यातील एका व्यक्तीने त्याचे नाव नितीन भाई असे सांगितले. मात्र, मी कोणालाही फोन केलेला नव्हता, तेच मी माझ्या सुरक्षा रक्षकाना सांगितले. पण माझा ठावठिकाणा त्यांना कसा कळला या विचाराने मला धक्का बसला, असे कोटेचा (Mihir Kotecha) यांनी मुख्य निवडणुक आयोगाला लिहलेल्या पत्रात म्हटले आहे.

(हेही वाचा – Mihir Kotecha यांचे निवडणूक आयुक्तांना पत्र, केली ‘ही’ मागणी)

ईशान्य मतदारसंघातून लोकसभा निवडणूक लढवलेल्या कोटेचा (Mihir Kotecha) यांनी पुढे सांगितले की, लोकसभेच्या प्रचारादरम्यान त्यांच्यावर अनेकदा हल्ले झाले. माझ्या बॅक ऑफिसवरही हल्ला करण्यात आल्याचे दोन प्रकरणे पोलीस ठाण्यात दाखल करण्यात आले आहे. मला संशय आहे की माझे विरोधक पुन्हा एकदा माझ्या जीवाचे बरेवाईट करण्याचा प्रयत्न करत आहेत. ते वाईट हेतूने माझ्या हालचालींवर लक्ष ठेवून आहेत, असे कोटेचा पुढे म्हणाले. मुख्य निवडणूक आयोगाने कोटेचा यांच्या पत्राची दखल घेऊन त्यांना अतिरिक्त सुरक्षा पुरवण्याचा आदेश मुंबई पोलिसांना एका पत्रकाद्वारे देण्यात आला आहे.

हेही पहा –

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.