Bihar By-Election : प्रशांत किशोर यांच्या पक्षामुळे बिहारच्या पोटनिवडणुकीला नवे वळण

70
Bihar By-Election : प्रशांत किशोर यांच्या पक्षामुळे बिहारच्या पोटनिवडणुकीला नवे वळण
  • प्रतिनिधी 

राजकीय रणनितीकार प्रशांत किशोर यांनी उडी मारल्यामुळे बिहारची पोटनिवडणूक त्रिकोणी झाली आहे. बिहारमध्ये चार जागांवर 13 नोव्हेंबरला पोटनिवडणूक होत आहे. प्रचाराची दिशा आणि दोन्ही आघाडीतील अस्वस्थता बरेच काही सांगणारी आहे. पोटनिवडणुकीचे निकाल अनेकांसाठी धक्कादायक असू शकतात. (Bihar By-Election)

बिहारच्या पोटनिवडणुकीत जातीय समीकरण मातब्बरांना धक्का देऊ शकते. महायुती आणि महाआघाडीच नव्हे तर जन सुराज पक्षाचे प्रमुख प्रशांत किशोर यांची सुद्धा अग्निपरीक्षा आहे. किशोर यांचा पक्ष महायुती आणि महाआघाडी यांच्यापैकी कुणाची वोटबँक फोडून काढते हे पाहणे सुद्धा मजेशीर राहणार आहे. (Bihar By-Election)

(हेही वाचा – दिवाळी, छट पूजा उत्सवानिमित्त Central Railway च्या ७४० विशेष ट्रेन सेवा)

पुढच्या वर्षी अर्थात 2025 च्या शेवटी शेवटी बिहार विधानसभेची निवडणूक होणे आहे. या निवडणुकीत कोणाची सरशी असेल हेही या निवडणुकीतून दिसून येणार आहे. मुख्यमंत्री नितीश कुमार यांचा संयुक्त जनता दल, लालू प्रसाद यादव यांचा राष्ट्रीय जनता दल आणि भारतीय जनता पक्ष यांच्यापैकी कुणाची वोटबँक अभेद्य आहे आणि कुणाची वोटबँक इकडे तिकडे सरकली आहे याचा अंदाज सुद्धा पोटनिवडणुकीच्या निकालातून दिसून येणार आहे. बिहारचा मतदार प्रशांत किशोर यांना घरी बसायला लावतो की ताकद देतो हेही दिसून येईल. (Bihar By-Election)

मागील 40 वर्षांपासून सवर्णाचे राजकारण कोमात असल्यासारखे आहे. राजदने यादव आणि मुस्लिम यांचे समीकरण साधून भाजपच्या राजकारणा ला यशस्वी होऊ दिले नाही. तर नितीशकुमार यांच्या जेडीयूने राज्यातील अन्य मागासवर्गीयांना एकत्र आणून स्वतःला राजकारणाच्या केंद्रास्थानी ठेवले आहे. आता प्रशांत किशोर यांचा प्रवेश झाला आहे. ते आता कोणती दिशा पकडतात हे पाहावे लागणार आहे. (Bihar By-Election)

हेही पहा –

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.