Uddhav Thackeray म्हणाले, जयंत पाटील किंवा जितेंद्र आव्हाड यांना मुख्यमंत्री करा, माझी हरकत नाही

102

विधानसभा निवडणुकीनंतर ‘संख्याबळानुसार मुख्यमंत्री’ या तत्वावर सहमती देवू, कारण महाराष्ट्र पुन्हा लुटारुंच्या हाती द्यायचा नाही, मग शरद पवारांनी जयंत पाटील किंवा जितेंद्र आव्हाड यांना मुख्यमंत्री पदी निवडले तरी माझी काही हरकत नाही, असे उबाठाचे प्रमुख उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांनी टीव्ही ९ ला मुलाखत देताना म्हटले.

लोकसभेत आमचा टेम्पो होता. त्याचा ट्रक झाला. माझ्या सभाच नाही विकास आघाडीच्या सभा बघा. लोकसभेसारख्या सभा होत आहे. लाडकी बहीण योजना आम्हाला अडचणीच्या ठरत नाही. ते महिलांना नोकर समजत आहेत. १५०० रुपये दरमहा नोकरीवर ठेवल्यासारखे बोलत असतो. भाऊ बहिणीला ओवाळणी देतो तेव्हा तो जाहीरात करत नाही. आमच्या जाहीरनाम्यात ३००० देणार याचा अर्थ आम्ही कर्तव्य म्हणून ती रक्कम देणार आहोत, असे  उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांनी सांगितले.

(हेही वाचा TISS च्या रिपोर्टवर राज ठाकरे म्हणाले, त्यांना आत घेण्यापेक्षा बांगलादेशी हिंदूंना..)

उद्धव ठाकरे बॅग तपासण्यावर काय म्हणाले?

बॅग तपासायला हरकत नाही. कायदा समान पाहिजे. मला आहे तसाच कायदा मोदी, शाह आणि सत्तेतील तिघांनाही आहे. मोदी पंतप्रधान आणि शाह गृहमंत्री म्हणून येत असतील तर चूक आहे. कारण ते संविधानाने बसले आहेत. माझ्याप्रमाणे त्यांच्या बॅगा तपासल्या पाहिजे. मोदी आणि शाह यांच्या बॅगा जाताना तपासा. कारण ते महाराष्ट्र लुटून नेत आहे. मी संतापलो नव्हतो. त्यांनी त्यांचे काम केले. मी माझे काम केले. जो अधिकार त्यांना आहे तो मलाही आहे, असं उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांनी स्पष्ट केले.

 

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.