Assembly Election 2024 : सरवणकर, सावंत जनतेमधील, पण अमित…? जनतेच्या मनात असा का निर्माण झाला प्रश्न

95
Mahim Assembly Fight : शेलारांच्या भूमिकेशी स्थानिक भाजपा नेते सहमत
  • विशेष प्रतिनिधी, मुंबई

माहीम विधानसभा मतदारसंघात शिवसेना, उबाठा शिवसेना आणि मनसे यांच्यात तिरंगी लढत चांगलीच चुरशी बनली असून तिन्ही पक्षाच्या उमेदवारांकडून प्रचार जोरात सुरु आहे. आतापर्यंत तिन्ही पक्षांच्या उमेदवारांकडून प्रचारात बाजी मारली जात असल्याने आता मतदारांमधूनही संमित्र प्रतिक्रिया ऐकू येऊ लागल्या आहेत. यामध्ये मनसेचे अमित राज ठाकरे यांचा बाजुने कौल दिला जात असला तरी प्रत्यक्षात हे आमदार म्हणून निवडून आल्यानंतर भेटायचे कुठे असा सवालच नागरिकांकडून केला जात आहे. सदा सरवणकर आणि महेश सावंत हे सर्वसामान्यांना सहज उपलब्ध असून जर अमित ठाकरे निवडून आले तर ते सहज जनतेला उपलब्ध होणार नाही अशाप्रकारची प्रतिक्रिया जनतेमधून ऐकायला येत असल्याने मनसे यावर काय भूमिका मांडते याकडे सर्वांचे लक्ष आहे. (Assembly Election 2024)

(हेही वाचा – TISS च्या रिपोर्टवर राज ठाकरे म्हणाले, त्यांना आत घेण्यापेक्षा बांगलादेशी हिंदूंना..)

माहीम विधानसभा निवडणुकीत शिवसेनेचे सदा सरवणकर, मनसेचे अमित राज ठाकरे आणि उबाठा शिवसेनेचे महेश सावंत हे निवडणूक रिंगणात असून मतदारांमधून आता संमिश्र प्रतिक्रिया ऐकायला मिळत आहे. या तिघांमध्ये कोण बाजी मारणार याबाबत अजुनही स्पष्टता दिसून येत नसली तरी सदा सरवणकर आणि महेश सावंत यांच्याबाबत जनतेतील लोकप्रतिनिधी अशाप्रकारची भावना ऐकायला मिळत आहे. परंतु अमित ठाकरे यांना राजसाहेब ठाकरे यांच्या नावावर जरी निवडून द्यायचे झाले तरी ते सर्वसामान्यांना कुठे भेटणार? शिवतिर्थावर भेट घ्यायला जायला मिळेल का? विभागात ते किती फिरतील असे प्रश्न मतदारांकडूनच  उपस्थित केले जात आहे. (Assembly Election 2024)

(हेही वाचा – Dharashiv District Assembly : २५ वर्षांत पहिल्यांदाच धाराशिव जिल्ह्यात विधानसभेला घड्याळ नाही)

अर्थात जनतेच्या  मनातील प्रश्न हे केवळ वरळीतील एका अनुभवावरून उपस्थित होत आहेत. वरळी विधानसभेतून मागील निवडणुकीत  उबाठा शिवसेनेचे नेते व युवा सुनेचे अध्यक्ष आदित्य ठाकरे यांना निवडून दिले. परंतु प्रत्यक्षात विभागातील जनतेला त्यांचे दर्शन फारच कमी वेळांमध्ये झाले. आदित्य ठाकरे यांच्याऐवजी आमदार सचिन अहिर आणि सुनील शिंदे यांचीच जनतेला भेट होत आणि आदित्य ठाकरे यांच्याऐवजी अहिर आणि शिंदे हेच विभागातील जनतेचे प्रश्न  हाताळत आहेत. त्यामुळे आदित्य ठाकरे हे विभागातील जनतेला उपलब्ध होत नाहीत तर माहीममध्ये अमित ठाकरे यांना निवडून दिल्यास वरळीप्रमाणे तर होणार नाही ना असा प्रश्न जनतेच्या मनात निर्माण होत आहे. त्यामुळे जनतेच्या मनात निर्माण होणाऱ्या या प्रश्नाबाबत स्पष्टीकरण होणे आवश्यक असून मनसे याबाबत विभागातील जनतेच्या मनातील या प्रश्नांचे निराकरण कसे करते याकडे सर्वांचे लक्ष आहे. (Assembly Election 2024)

हेही पहा –

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.