Uddhav Thackeray यांच्या बॅगांची तपासणी करणाऱ्या भरारी पथकाचं निवडणूक आयोगाकडून कौतुक!

187
Uddhav Thackeray यांच्या बॅगांची तपासणी करणाऱ्या भरारी पथकाचं निवडणूक आयोगाकडून कौतुक!
Uddhav Thackeray यांच्या बॅगांची तपासणी करणाऱ्या भरारी पथकाचं निवडणूक आयोगाकडून कौतुक!

उबाठा गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांच्या हेलिकॉप्टरची आणि बॅगांची तपासणी निवडणूक आयोगाच्या (Election Commission) भरारी पथकाने केली होती. उद्धव ठाकरे यांनी या घटनेचा व्हिडीओ चित्रित केला होता. हा व्हिडीओ सोशल मिडीयावर प्रचंड व्हायरल झाला होता. यानंतर निवडणूक आयोगाने भरारी पथकातील सदस्यांचं आता या कामगिरीबद्द्ल कौतुक केलं आहे. (Uddhav Thackeray)

(हेही वाचा-Assembly Election 2024 : ५०२ कोटींची मालमत्ता जप्त; निवडणूक यंत्रणेची कारवाई)

या कार्याबद्दल सामान्य निरिक्षक सज्जन राजसेकर (आयएएस) यांनी कौतुक केले असून अभिनंदन करून प्रमाणपत्र दिले आहे. या पथकामध्ये भरारी प्रथक प्रमुख नितीन बांगडे, भरारी पथक सहायक अमोल गाठे, पोलीस कॉन्स्टेबल पुरुषोत्तम डडमल आणि पोलीस कॉन्स्टेबल प्रवीण जाधव यांच्या समावेश होता. (Uddhav Thackeray)

(हेही वाचा-Maharashtra Assembly Election : राज्यातील ४२६ मतदान केंद्रांचे नियंत्रण महिलांच्या हाती)

तपासणीदरम्यान निपक्षपातीपणा राखून निवडणूक आयोगाचे मार्गदर्शक तत्वांचे पालन केले, पारदर्शकतेच्या तत्त्वांना बळकळी दिली त्यामुळे निवडणूक आयोगाची ही उच्च मानके प्रतिबिंबित झाली असे प्रमाणपत्र दिले. (Uddhav Thackeray)

हेही पहा-

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.