गेल्या २४ तासांत उबाठा गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांच्या बॅगेची दोन वेळा तपासणी करण्यात आली. या तपासणीचा व्हिडीओ चित्रीत करून उद्धव ठाकरे यांनी व्हायरल केला. यामुळे ठाकरेंची आगपाखड झालेली पहायला मिळाली. उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांनी नाराजी व्यक्त करत देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्यावर निशाणा साधला होता. यावर आता भाजपकडून ठाकरेंना चोख प्रत्त्युत्तर देण्यात आलं आहे.
जाऊ द्या, काही नेत्यांना तमाशा करण्याची सवयच असते!
हा व्हीडिओ पहा, 7 नोव्हेंबरला यवतमाळ जिल्ह्यात आमचे नेते मा. देवेंद्रजी फडणवीस यांच्या बॅगची तपासणी झाली. पण, त्यांनी ना कोणता व्हीडिओ काढला, ना कोणती आगपाखड केली. तत्पूर्वी, 5 नोव्हेंबर रोजी कोल्हापूर विमानतळावर सुद्धा मा.… pic.twitter.com/ebkuigJE2E— भाजपा महाराष्ट्र (@BJP4Maharashtra) November 13, 2024
देवेंद्र फडणवीस यांच्या बॅग्जची तपासणी
काही नेत्यांना तमाशा करण्याची सवयच असते. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांच्या बॅगची देखील तपासणी झाली. पण, त्यांनी ना कोणता व्हिडिओ काढला, ना कोणती आगपाखड केली असं म्हणत भाजप पक्षाकडून ठाकरेंवर टीका केली आहे. यावेळी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या बॅगचीही तपासणी झाल्याचा व्हिडिओ भाजपकडून ट्विट करण्यात आला आहे. 5 नोव्हेंबर रोजी कोल्हापूर विमानतळावर देवेंद्र फडणवीस यांच्या बॅग्जची तपासणी करण्यात आली होती. भाजपाकडून याबाबतचा व्हिडिओ आपल्या सोशल मिडिया एक्स अकाऊंटवरून शेअर केला आहे. (Uddhav Thackeray)
नितीन गडकरींचीही तपासणी
ECI officials check Union Minister Nitin Gadkari’s belongings.
No drama or intimidation by his team unlike other leaders. pic.twitter.com/qjoGEBRvWB
— Information & Updates (@satish_vlog) November 12, 2024
केंद्रीय मंत्री नितीन गडकरी (Nitin Gadkari) यांच्याही हेलिकॉप्टरची तपासणी केली असल्याची माहिती समोर आली आहे. लातूर जिल्ह्यात मंगळवारी सभा घेण्यासाठी आले असताना नितीन गडकरी यांच्या हेलिकॉप्टरची तपासणी करण्यात आली. (Uddhav Thackeray)
हेही पहा-
Join Our WhatsApp Community