Border – Gavaskar Trophy 2024 : भारतीय संघाचा ऑस्ट्रेलियात पहिला सराव, पर्थमधून पहिला व्हीडिओ 

Border - Gavaskar Trophy 2024 : भारतीय संघ पुढील १० दिवस पर्थमध्ये सराव करणार आहे 

52
Border - Gavaskar Trophy 2024 : भारतीय संघाचा ऑस्ट्रेलियात पहिला सराव, पर्थमधून पहिला व्हीडिओ 
Border - Gavaskar Trophy 2024 : भारतीय संघाचा ऑस्ट्रेलियात पहिला सराव, पर्थमधून पहिला व्हीडिओ 
  • ऋजुता लुकतुके

मायदेशात न्यूझीलंड विरुद्घच्या पराभवाने पोळलेल्या भारतीय संघाने ऑस्ट्रेलियात पोहोचल्या पोहचल्या सराव सुरू केला आहे. वेस्ट ऑस्ट्रेलिया क्रिकेट असोसिएशन अर्थात, वाकाच्या मैदानात संघाचं पहिलं सराव सत्र मंगळवारी पार पडलं. न्यूझीलंड विरुद्घ भारतीय फलंदाज अपयशी ठरले होते. त्यामुळे सराव सत्रातही फलंदाजांनीच आधी सराव केला. रिषभ पंत आणि यशस्वी जयसवाल सगळ्यात आधी नेट्समध्ये उतरले होते. फोर्ब्सचे पत्रकार ट्रिस्टियन लॅविएट यांनी ऑस्ट्रेलियातून भारतीय सरावाचा पहिला व्हीडिओ ट्विट केला आहे. (Border – Gavaskar Trophy 2024)

 पर्थमधील खेळपट्टी ही पारंपरिक दृष्ट्या जलद गोलंदाजीला साथ देणारी आणि चेंडूला उसळी देणारी असते. अशा खेळपट्टीवर यशस्वी जयसवाल गोलंदाजीला आत्मविश्वासाने सामोरं जाताना दिसला, असं ट्रिस्टियनने आपल्या आहवालात म्हटलं आहे. त्याने भारतीय सरावादरम्यान घेतलेल्या दुसऱ्या एका छायाचित्रात कसोटीसाठी वापरण्यात येणारा लाल चेंडू दाखवला आहे. आणि हा चेंडू रस्त्यावर पडलेला होता. यशस्वीने मारलेला जोरदार फटका मैदान ओलांडून रस्त्यावर आला, असं ट्रिस्टियनने लिहिलं आहे.  (Border – Gavaskar Trophy 2024)

(हेही वाचा- Pune Crime : दुसर्‍यासोबत दिसली म्हणून मैत्रिणीला केली जबडा फ्रॅक्चर होईपर्यंत मारहाण)

 भारतीय संघाने आपला सराव चाहत्यांपासून गुप्त ठेवला आहे. संघ जिथे सराव करतोय त्या भोवती कुंपणाच्यावर काळे पडदे लावण्यात आले आहेत. तसंच भारतीय संघ लोकांशी जास्त न मिसळता सरावावरच लक्ष देताना दिसतोय. (Border – Gavaskar Trophy 2024)

 न्यूझीलंड विरुद्धच्या पराभवानंतर भारतीय संघ बॅकफूटला गेला आहे. आणि पुरेशी तयारी न करता कसोटी खेळल्याचा आरोप भारतीय संघावर होतोय. शिवाय ऑस्ट्रेलियासारख्या खडतर दौऱ्यापूर्वीही भारतीय संघाकडे सरावासाठी फक्त १० दिवस आहेत. त्यामुळे हे दिवस फक्त आणि फक्त सरावासाठी वापरण्याचा गौतम गंभीर यांचा मानस आहे. या १० दिवसांत भारतीय संघाने ए संघाबरोबर एक सराव सामना घेण्याचं आधी ठरवलं होतं. पण, गंभीरने तो सामनाही रद्द केला आहे. आणि आयसीसी कसोटी अजिंक्यपद स्पर्धेची अंतिम फेरी गाठायची असेल तर भारताला आगामी ५ कसोटींपैकी किमान ४ जिंकणं आवश्यक आहे. (Border – Gavaskar Trophy 2024)

हेही पहा- 

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.