- ऋजुता लुकतुके
आयपीएलमध्ये आता संघांनी मेगा लिलावाची तयारी सुरू केली आहे. २४ आणि २५ तारखेला जेद्दाह इथं हा लिलाव होणार आहे. त्यापूर्वी आयपीएल फ्रँचाईजी कुठल्या खेळाडूंना विकत घ्यायचं याची रणनीती तयार करण्यात गुंतल्या आहेत आणि यात महत्त्वाची भूमिका बजावणारे प्रशिक्षक नेमणं ही त्याची पहिली पायरी आहे. दिल्ली कॅपिटल्स संघाने गोलंदाजीचा प्रशिक्षक म्हणून मुनाफ पटेलला नेमलं आहे. मेगा लिलावापूर्वी दिल्ली फ्रँचाईजीने कुलदीप यादव, अभिषेक पोरेल, ट्रिस्टियन स्टब्ज आणि अक्षर पटेल यांना कायम ठेवलं आहे. दोन फिरकीपटू संघात आहेत. आता लिलावात चांगले तेज गोलंदाज निवडणे ही मुनाफ पटेलची जबाबदारी असेल. (IPL 2025)
(हेही वाचा – Suryakumar Yadav : हेन्रिक क्लासेनने ‘या’ खेळाडूला म्हटलं टी-२० मधील ‘गोट’)
Old-school grit 🤝 Winning mindset
Welcome to DC, legend 🥹💙 pic.twitter.com/d62DSCcqNR
— Delhi Capitals (@DelhiCapitals) November 12, 2024
मुनाफ पटेल २००६ ते २०११ या कालावधीत भारतीय संघाकडून १३ कसोटी, ७० एकदिवसीय सामने आणि ३ टी-२० सामने खेळला आहे. दिल्लीचे मुख्य प्रशिक्षक हेमांग बदानी आणि क्रिकेट संचालक वेणुगोपाळ राव यांच्याबरोबर आता मुनाफ पटेल काम करेल. २०११ च्या एकदिवसीय विश्वचषक स्पर्धेत मुनाफ पटेलची अचूक दिशा आणि टप्प्यावर केलेली गोलंदाजी प्रभावी ठरली होती. (IPL 2025)
(हेही वाचा – अनिल देशमुख यांना क्लीनचीट नाही; Justice Chandiwal यांचा खळबळजनक दावा)
❤️💙 ➡️ 😄 pic.twitter.com/04uaunVDqF
— Delhi Capitals (@DelhiCapitals) November 12, 2024
खासकरून भारतीय खेळपट्टीवर प्रभावी मारा करण्यासाठी मुनाफ पटेल ओळखला जातो. त्याच्या अनुभवाचा फायदा दिल्ली संघाला होईल असा संघ प्रशासनाचा मानस आहे. (IPL 2025)
हेही पहा –
Join Our WhatsApp Community