राहुल गांधींना देशात गृहयुद्ध हवे; Giriraj Singh यांचा आरोप

56

केंद्रीय मंत्री गिरीराज सिंह (Giriraj Singh) यांनी राहुल गांधी आणि काँग्रेसवर देशात गृहयुद्ध भडकवल्याचा आरोप केला आहे. देशाला जर कोणाकडून धोका असेल तर तो काँग्रेस पक्षाकडून आहे, ज्यांना देशात गृहयुद्ध घडवायचे आहे. काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांच्या विधानाला उत्तर देताना गिरीराज सिंह यांनी हे वक्तव्य केले असून त्यांनी देशाला आरएसएस-भाजप, नरेंद्र मोदी आणि अमित शाह यांच्यापासून धोका असल्याचे म्हटले होते.

काय म्हणालेले खरगे? 

काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांनी रविवारी संविधान बचाओ परिषदेत भाजपा आणि आरएसएसवर निशाणा साधला होता. भाजपच्या बंटोगे ताे कटोंगे या घोषणाबाजीवरही त्यांनी टीका केली. भाजपा सध्या नवीन घोषणा घेऊन येत आहे. देशाला जर कोणापासून धोका असेल तर तो भाजपा-आरएसएसपासून आहे, कारण हेच लोक सकाळपासून संध्याकाळपर्यंत फूट पाडा आणि कट करा असेच बोलत राहतात. तर खरगे यांनी काँग्रेस हा देशाला जोडणारा पक्ष असल्याचे सांगितले. आम्ही नेहमीच देशाला एकसंध ठेवण्याचा प्रयत्न केला आहे. देश एकसंध ठेवण्यासाठी इंदिरा गांधी हुतात्मा झाल्या.

(हेही वाचा बांगलादेशी आणि रोहिंग्यांना मुंबईबाहेर काढणार; Amit Shah यांचा घणाघात)

खरगे यांना भाजपा नेत्यांनी केला विरोध 

खरगे यांच्या आरोपानंतर भाजपा नेत्यांनी काँग्रेस अध्यक्ष आणि पक्षावर समाजात फूट पाडण्याचा आणि जातीपातीचा एकमेकांवर आरोप केला. छत्तीसगडचे उपमुख्यमंत्री अरुण साओ म्हणाले, देशातील जनतेला चांगलेच माहित आहे की देशाला कोणाचा धोका आहे? काँग्रेस देशात लोकांना एकमेकांच्या विरोधात उभे करत आहे. पक्षावर चुकीची माहिती पसरवल्याचा आरोपही त्यांनी केला. (Giriraj Singh)

 

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.