Congress नेत्यांचे वादग्रस्त वक्तव्य; डॉ. बाबासाहेब आंबेडकर इस्लाम धर्म स्वीकारण्यास तयार होते पण…

128
Congress नेत्यांचे वादग्रस्त वक्तव्य; डॉ. बाबासाहेब आंबेडकर इस्लाम धर्म स्वीकारण्यास तयार होते पण...
Congress नेत्यांचे वादग्रस्त वक्तव्य; डॉ. बाबासाहेब आंबेडकर इस्लाम धर्म स्वीकारण्यास तयार होते पण...

भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर हे इस्लाम धर्म स्वीकारण्यास तयार होते, असा दावा काँग्रेसचे (Congress) नेते आणि माजी आमदार सय्यद अजीम पीर खादरी यांनी दि. १२ नोव्हेंबर रोजी केले आहे. तसेच पुढे ते म्हणाले,बाबासाहेबांनी इस्लाम स्वीकारला असता तर राज्याचे गृहमंत्री जी. परमेश्वर आणि आज असणारे अनेक दलित मुस्लिम झाले असते, असे वादग्रस्त वक्तव्य खादरी यांनी केले. (Congress)

( हेही वाचा : Ajit Pawar Video: बारामतीत अजित पवारांच्या बॅगा तपासल्या! म्हणाले, “खा…”

दरम्यान खादरी यांचे वक्तव्य व्हायरल झाल्यानंतर काँग्रेस नेत्यांनी मात्र यावर स्पष्टीकरण देण्यास टाळले. शिग्गाव येथे प्रचार सभेत खादरी बोलत होते. ते म्हणाले की, डॉ. बाबासाहेब आंबेडकर हे इस्लाम धर्म स्वीकारण्यास तयार होते, परंतु नंतर त्यांनी बौद्ध झाले, असा दावा खादरी यांनी केला. (Congress)

याप्रकरणी भाजपाचे नेते सी. टी. रवी म्हणाले की, खादरीचे विधान त्यांचे आणि त्यांच्या पक्षाचे अज्ञान दर्शवते. हैदराबादच्या निजामाने डॉ. बाबासाहेब आंबेडकरांना इस्लाममध्ये सामील करून घेण्याचे प्रयत्न केले आणि त्यांनी त्यांना करोडो रुपयांची लाच देण्याचा प्रयत्न केला. मात्र आंबेडकर स्पष्टपणे म्हणाले की, इस्लाममध्ये समानता नाही आणि त्यात असहिष्णूता आहे, असे रवी सी.टी.रवी म्हणाले. (Congress)

हेही पाहा :

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.