Amit Shah यांचे मोठे वक्तव्य; म्हणाले, इंदिरा गांधी स्वर्गातून खाली उतरल्या, तरी…

417

राज्यात विधानसभा निवडणुकीसाठी (Assembly Election 2024) अवघे काही दिवस शिल्लक राहिले आहेत. येत्या २० नोव्हेंबर रोजी मतदान होणार असून, २३ नोव्हेंबर रोजी निकाल जाहीर होणार आहे. तत्पूर्वी प्रचारसभांचा जोर शिगेला पोहोचला आहे. दरम्यान, जम्मू-काश्मीरमध्ये (Section 370) नवीन सरकार स्थापन झाल्यानंतर कलम ३७० परत आणण्यात येणार असल्याच्या चर्चा रंगू लागल्या आहेत. आता याच मुद्द्यावरुन केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी मोठे वक्तव्य केले आहे.

महाराष्ट्रातील धुळे जिल्ह्यातील सिंदखेडा येथे एका निवडणूक सभेला संबोधित करताना अमित शाह म्हणाले की, कोणत्याही परिस्थितीत जम्मू-काश्मीरमध्ये कलम ३७० परत येणार नाही. राहुल गांधी जम्मू-काश्मीरमध्ये कलम ३७०  परत करण्याची भाषा करतात. पण इंदिरा गांधीदेखील स्वर्गातून खाली उतरल्या, तरी जम्मू-काश्मीरमध्ये कलम ३७० परत येणार नाही.’ते पुढे म्हणाले, ‘महायुती (Mahayuti) म्हणजे ‘विकास’ आणि महाविकास आघाडी म्हणजे ‘विनाश’. विकास आणणाऱ्यांना सत्तेवर आणायचे की उद्ध्वस्त करणाऱ्यांना हे तुम्हीच ठरवायचे आहे. (Amit Shah)

(हेही वाचा – Ajit Pawar Video: बारामतीत अजित पवारांच्या बॅगा तपासल्या! म्हणाले, “खा…”)

माजी पंतप्रधान मनमोहन सिंग (EX PM Manmohan Singh) यांच्यावर निशाणा साधत अमित शाह म्हणाले, की ‘पंतप्रधान मोदींनी देशाला समृद्ध आणि सुरक्षित बनवले आहे. मनमोहन सिंग यांच्या काळात जागतिक अर्थव्यवस्थांच्या यादीत भारत अकराव्या क्रमांकावर होता, मात्र मोदींनी (PM Narendra Modi) देशाला पाचव्या स्थानावर आणले. २०२७ मध्ये भारताची अर्थव्यवस्था जगातील तिसरी सर्वात मोठी अर्थव्यवस्था असेल. आघाडीचे लोक (महाविकास आघाडी) खोटी आश्वासने देतात.

हेही पाहा –

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.