- प्रतिनिधी
यवतमाळ जिल्ह्यात विधानसभा निवडणुकीचा आखाडा तापायला सुरुवात झाली आहे. सातही विधानसभा मतदारसंघात १०२ उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात आहेत. डॉक्टर, प्राध्यापक, वकील, इंजिनिअर आदींसह उच्चशिक्षित उमेदवारही रिंगणात आहेत. दुसरी, चौथी, सातवीपर्यंत शिक्षण घेतलेले अल्पशिक्षितांनीही दंड थोपटले आहे. राजकीय पक्षांनी उच्चशिक्षितांनाच उमेदवारी देण्यावर भर दिला आहे. आता निवडणुकीच्या आखाड्यात कोण कुणाला धोबीपछाड देणार, हे प्रत्यक्ष मतमोजणीनंतरच स्पष्ट होणार आहे.
यवतमाळ मतदारसंघात भाजपाचे मदन येरावार यांचे शिक्षण डी. फार्म, काँग्रेसचे बाळासाहेब मांगुळकर १२ वी उत्तीर्ण, वंचितचे नीरज वाघमारे ११ वी, प्रहारचे बिपीन चौधरी बी. कॉम. एम.बी.ए. आहेत. अपक्ष व अन्य पक्षांचे उमेदवार चौथी, पाचवी, सहावी, सातवी, बारावी, बी.ए., एम.ए., डिप्लोमा सिव्हिल, एलएलबीपर्यंत शिक्षण घेतलेले आहेत. वणी मतदारसंघात शिवसेना उबाठाचे संजय देरकर यांचे शिक्षण एम.एस्सी. (रसायन शास्त्र), भाजपाचे संजीवरेड्डी बोदकुरवार बी.ए., मनसेचे राजू उंबरकर दहावी, तर अपक्ष संजय खाडे बीए द्वितीय वर्ष आहेत. अन्य उमेदवार दुसरी, चौथी, एस.एस.सी., आयटीआय, एम.ए., बी.एस्सी., बी.ई. आहेत. (Yavatmal District Assembly)
(हेही वाचा – Uddhav Thackeray म्हणाले, जयंत पाटील किंवा जितेंद्र आव्हाड यांना मुख्यमंत्री करा, माझी हरकत नाही)
दिग्रस मतदारसंघात काँग्रेसचे माणिकराव ठाकरे यांचे शिक्षण बी.ए. द्वितीय वर्ष, शिवसेना शिंदे गटाचे संजय राठोड यांचे शिक्षण बी. कॉम., बी.पी.एड., तर अन्य उमेदवारांचे शिक्षण नववी, बारावी, बी.ए., पशुसंवर्धन पदविका, पत्रकारिता पदवी, कॉम्प्युटर इंजिनिअरिंग पदविका, जीएनएम नर्सिंग असे झाले आहे. राळेगाव मतदारसंघात उच्चशिक्षित उमेदवारांचा भरणा आहे. काँग्रेसचे प्रा. वसंतराव पुरके यांचे शिक्षण एम.ए. (मराठी) एचडीएड, भाजपाचे प्रा. डॉ. अशोक उईके यांचे शिक्षण एम.एस्सी. (प्राणीशास्त्र), पीएच.डी, प्रहारचे डॉ. अरविंद कुडमेथे एम.बी.बी.एस., तर अन्य उमेदवारांचे शिक्षण बारावी, बी.ए., बी.एड. पर्यंत झाले आहे.
उमरखेड मतदारसंघात उच्चशिक्षित उमेदवार आहेत. काँग्रेसचे साहेबराव कांबळे यांचे शिक्षण कृषी पदविका, भाजपाचे किसन वानखेडे यांचे शिक्षण कनिष्ठ अभियंता व्यावसायिक परीक्षा, स्थापत्य अभियांत्रिकी प्रमाणपत्र अभ्यास, मनसेचे राजेंद्र नजरधने एम.ए., बी.पी.एड., तर अन्य उमेदवारांचे शिक्षण सातवी, नववी, दहावी, डीएचएमएस, बी.ए., बी.एड., एम.ए., डी. लिट, असे झाले आहे. (Yavatmal District Assembly)
आर्णी मतदारसंघात काँग्रेसचे जितेंद्र मोघे यांचे शिक्षण बी.ए., भाजपाचे प्रा. राजू तोडसाम एम.ए., बी.एड., तर अन्य अपक्षांसह पक्षीय उमेदवारांचे शिक्षण दहावी, बारावी, आयटीआय, बी.ए., एम.ए., बी.एड., एल.एल.बी., एल.एल.एम., एम.ए., नेट, सेट, टीईटी,बी.ई. मेकॅनिकलपर्यंत झाले
आहे. पुसद मतदारसंघात राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे शरद मैंद यांचे शिक्षण बी.ई. (अपिअर), राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे इंद्रनील नाईक एलएलबी, वंचितचे माधव वैद्य बी.कॉम. एम. कॉम. पर्यंत आहे. तर अपक्ष व अन्य पक्षीय उमेदवारांचे शिक्षण दहावी, बारावी, बीए, एलएलबी, पीएचडी असे झाले आहे.
(हेही वाचा – Uddhav Thackeray यांच्या बॅग तपासणीला BJP चं प्रत्त्युत्तर; देवेंद्र फडणवीसांचा ‘तो’ व्हिडिओ केला शेअर)
यवतमाळ विधानसभा परंपरागत स्पर्धक आमने-सामने
जिल्हा मुख्यालय असलेल्या यवतमाळ विधानसभेत २०१४ पासून भाजपाच्या म्हणजेच महायुतीच्या उमेदवाराला निसटता विजय मिळाला आहे. आताही महायुतीचे मदन येरावार आणि महाविकास आघाडीतील काँग्रेसचे उमेदवार बाळासाहेब मांगुळकर यांच्यातच थेट लढत होत आहे. बसपाकडून भाई अमन तर वंचितकडून डॉ. नीरज वाघमारे, प्रहार जनशक्ती पक्षाकडून बिपीन चौधरी, राष्ट्रीय समाज पक्षाचे धरम ठाकूर, इंडियन नॅशनल लीगकडून शब्बीर खान निवडणूक रिंगणात आहेत. एकूण २२ उमेदवार निवडणूक लढत आहेत.
दिग्रस विधानसभा आजी-माजी मंत्र्यात लढत
दिग्रस विधानसभेच्या लढतीकडे राज्याचे लक्ष लागले आहे. येथे महाविकास आघाडीकडून काँग्रेस उमेदवार माणिकराव ठाकरे विरुद्ध विद्यमान पालकमंत्री तथा महायुतीचे उमेदवार संजय राठोड यांच्यात थेट सामना रंगणार आहे. या मतदारसंघात वंचित बहुजन आघाडीकडून नाजूकराव धांदे, प्रहार जनशक्त्ती पक्षाकडून विवेक ठाकरे, बहुजन समाज पार्टीकडून संदीप देवकते यांच्यासह अपक्ष मिळून एकूण १३ उमेदवार निवडणूक रिंगणात कायम आहेत. येणाऱ्या काळात या मतदारसंघात जोरदार प्रचाराची रणधुमाळी रंगलेली दिसेल. (Yavatmal District Assembly)
(हेही वाचा – अनिल देशमुख यांना क्लीनचीट नाही; Justice Chandiwal यांचा खळबळजनक दावा)
राळेगाव विधानसभा बंडखोर ठरणार निर्णायक
राळेगाव विधानसभेत सेवानिवृत्त प्राचार्य डॉ. अशोक उईके व प्रा. वसंत पुरके यांच्यात थेट लढत होत आहे. महायुती व महाविकास आघाडीत या दोन्ही उमेदवारांपुढे बंडखोरांचे आव्हान कायम आहे. काँग्रेसमधून उमेदवारीस इच्छुक असणारे बंडखोर किरण कुमरे (वंचित बहुजन आघाडी), अशोक मेश्राम (मनसे), अरविंद कुडमेथे (प्रहार जनशक्त्ती पार्टी) या पक्षांकडून लढत आहेत. तसेच गोंगपाकडून जीवन कोवे, रासपकडून रामदास माहुरे, सन्मान राजकीय पक्षाकडून सुवर्णा अरुण नागोसे यांच्यासह एकूण ११ उमेदवार लढत आहेत.
वणी विधानसभा आघाडीतील बंड कायम
वणी विधानसभेत महाविकास आघाडीतील काँग्रेसच्या बंडखोराने मोठे आव्हान उभे केले आहे, संजय खाडे यांनी अपक्ष नामांकन कायम ठेवले. त्यामुळे आघाडीतील शिवसेना उबाठाचे उमेदवार संजय देरकर, महायुतीतील भाजपाचे उमेदवार संजीवरेड्डी बोदकुरवार, मनसेचे राजू उंबरकर, वंचितचे राजेंद्र निमस टकर, कम्युनिस्ट पार्टीचे अनिल हेपट यांच्यात लढत होण्याची स्थिती आहे. यात राजकीय पक्षाच्या उमेदवारांसह सहा अपक्ष उमेदवार निवडणुकीत नशीब आजमावत आहे. या मतदारसंघात एकूण १२ उमेदवार निवडणूक लढवत आहेत. (Yavatmal District Assembly)
पुसद विधानसभा राष्ट्रवादी काँग्रेसमध्येच लढत
पुसद विधानसभेत राष्ट्रवादी काँग्रेसचा दबदबा राहिला आहे. येथे नाईक घराण्यातीलच उमेदवार आतापर्यंत विजयी झाला आहे. राष्ट्रवादी अजित पवार गटाकडून आमदार इंद्रनील नाईक तर राष्ट्रवादी शरद पवार गटाकडून शरद मैंद अशी थेट लढत होण्याची चिन्हे आहेत. या व्यतिरिक्त मनसेचे अश्विन जयस्वाल, बसपाचे शरद भगत, वंचितचे माधव वैद्य, जनवाद पार्टीचे डॉ. अर्जुनकुमार राठोड, स्वाभिमानी पक्षाचे मनीष जाधव, आझाद समाज पार्टीचे मारोती भस्मे, निर्भय महाराष्ट्र पार्टीचे सुश्रुत चक्करवार यांच्यासह चार अपक्ष उमेदवार रिंगणात आहेत.
(हेही वाचा – आयपीएल क्रिकेट सामन्यांच्या संरक्षण शुल्कात कपात का केली ?; Bombay High Court चा प्रश्न)
उमरखेड विधानसभा माजी आमदारांमुळे बहुरंगी लढतीचे चित्र
उमरखेड विधानसभा मतदारसंघात महाविकास आघाडीकडून साहेबराव कांबळे काँग्रेसचे उमेदवार आहे. तर महायुतीतून भाजपचे किसन वानखेडे उमेदवार आहे. या दोन्ही उमेदवारांपुढे काँग्रेसचे माजी आमदार विजय खडसे (अपक्ष) तर भाजपचे माजी आमदार राजेंद्र नजरधने (मनसे) हे दोघेही रिंगणात आहे, यासोबतच वंचितकडून तातेराव हनवते, बसपाचे सुभाष रणवीर, आझाद समाज पार्टीचे देवानंद पाईकराव, रासपचे प्रज्ञेश पाटील यांच्यासह १७ उमेदवार आहेत.
आर्णी विधानसभा बंड शमल्याने आघाडी-युतीत थेट लढत
आर्णी विधानसभा मतदारसंघात माजी आमदार राजू तोडसाम महायुतीकडून भाजपचे उमेदवार आहेत. तर महाविकास आघाडीकडून जितेंद्र मोघे काँग्रेसचे उमेदवार आहे. ऐनवेळी येथील बंड शमविण्यात आघाडी व महायुतीला यश आले आहे. बसपाकडून श्रीनिवास सोयाम, प्रहार जनशक्त्ती पक्षाकडून नीता मडावी यांच्यासह १४ उमेदवार लढतीत आहेत. (Yavatmal District Assembly)
हेही पहा –
Join Our WhatsApp Community