Maharashtra Assembly Election : सलग ७ ते ८ वेळा निवडून येणाऱ्या दिग्गजांनाही यंदाची निवडणूक सोपी नाही

110
Maharashtra Assembly Election : सलग ७ ते ८ वेळा निवडून येणाऱ्या दिग्गजांनाही यंदाची निवडणूक सोपी नाही
  • प्रतिनिधी

महाराष्ट्रात मुख्यतः गेल्या ५ वर्षात राजकारणात ज्या विचित्र व वेगवान घडामोडी घडल्या आहेत ते पाहता भले भले राजकीय निरीक्षक, पंडितही चक्रावले आहेत. त्यामूळेच की काय यंदाच्या निवडणुकीत महाविकास असो वा महायुती या दोनही आघाड्यांपैकी नेमके कोण बाजी मारणार आणि सत्तेच्या जवळ पोहचणार हे आज कोणीही छातीठोकपणाने सांगण्यास धजावत नाही.

२०२४ च्या महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीतही (Maharashtra Assembly Election) असे ११ मोठे राजकारणी आहेत, जे गेल्या पाच निवडणुकांमध्ये सातत्याने विजयाचा झेंडा फडकवत आहेत. गेल्या ७ निवडणुकीत अपराजित राहिलेले तीन आमदार आहेत. अशा विक्रमी आमदारांमध्ये काँग्रेस नेते बाळासाहेब थोरात यांचाही समावेश आहे, ते १९९५ पासून सलग ८ वेळा संगमनेरमधून आमदार म्हणून निवडून आले आहेत आणि यावेळी पुन्हा निवडणूक लढवत आहेत. महाराष्ट्रात अजित पवार, कालिदास कोळंबकर, गिरीश महाजन आणि मंगल प्रभात लोढा यांच्यासारखे नेते आहेत, जे कधीही निवडणूक हरले नाहीत. राज्यात सर्वाधिक विजयाचा विक्रम शेतकरी कामगार पक्षाचे ज्येष्ठ नेते गणपतराव अण्णासाहेब देशमुख यांच्या नावावर आहे. अण्णासाहेब देशमुख १९६२ मध्ये पहिल्यांदा आमदार झाले आणि त्यानंतर ११ वेळा विजयी झाले. या प्रदीर्घ कार्यकाळात त्यांना १९७२ आणि १९९५ मध्ये दोनदा पराभवाला सामोरे जावे लागले. १९९५ मध्ये त्यांचा त्यांच्या नातवाकडून अवघ्या १९० मतांनी पराभव झाला होता. २०१४ च्या मोदी लाटेतही त्यांनी दणदणीत विजय मिळवला होता. १९७८ मध्ये शरद पवार मुख्यमंत्री झाले तेव्हा ते त्यांच्या सरकारमध्ये मंत्रीही होते.

(हेही वाचा – Amit Shah यांचे मोठे वक्तव्य; म्हणाले, इंदिरा गांधी स्वर्गातून खाली उतरल्या, तरी…)

काँग्रेस नेते बाळासाहेब थोरात संगमनेरचे ८ वेळा आमदार असलेले, यावेळी ९ व्यांदा निवडणूक लढवत आहेत. राष्ट्रवादीचे जयंत पाटील इस्लामपूरमधून सात वेळा निवडणूक जिंकलेले, १९९० पासून ते अजिंक्य झाले आहेत. दिलीप वळसे पाटील आंबेगावमधून सलग ७ वेळा विजयाचा विक्रम, अद्याप निवडणूक हरलेली नाही. अजित पवार राष्ट्रवादीचे अध्यक्ष १९९० पासून बारामतीचे आमदार आहेत. महाराष्ट्रात होणाऱ्या विधानसभेच्या निवडणुकीसाठी (Maharashtra Assembly Election) येत्या २० तारखेला प्रत्यक्ष मतदान होणार आहे. मात्र तरीही महाविकास आघाडीमध्ये सामील प्रमुख पक्ष काँग्रेस, त्याखालोखाल उद्धव ठाकरे यांची शिवसेना उबाठा, आणि शरद पवार यांची राष्ट्रवादी काँग्रेस या तीन पक्षांपैकी प्रत्यक्ष निकालावेळी कोणाच्या किती जागा निवडून येणार हे अद्याप छातीठोकपणाने सांगण्याची हिंमत कोणाही करू धजावत नाही.

कारण नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणुकीत सत्ताधारी महायुतीला व त्यातही प्रामुख्याने भाजपाला २३ जागांवरून ९ जागांवर यावे लागल्याने जबर फटाका बसला. तर महायुतीत नुकत्याच सहभागी झालेल्या अजित पवार यांनी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये फूट पाडल्याने शरद पवारांच्या बाजूने जी सहानुभूतीची लाट आली व त्यांनी जिद्दीने जो प्रचाराचा धडाका लावला त्यामुळे शरद पवारांना सुध्दा या निवडणूकीत अनपेक्षित यश मिळाले तर अजित पवार यांना जबर फटका बसला. अशात काँग्रेसने मात्र देशभरात भाजपाच्या विरोधात संविधान बदलणार हा मुद्दाच आक्रमकपणे लावून धरल्याने महाराष्ट्रात त्या पक्षाने स्वप्नातही विचार केला नसेल किंवा भल्या भल्या राजकीय पंडितांनाही वाटले नसेल त्यांना तब्बल १४ जागा मिळाल्या. त्यामुळेच की काय यंदाच्या निवडणुकीकडे केवळ राज्याचे, देशाचेच नव्हे तर जगातील अनेक देशांचे लक्ष लागले आहे.त्यामुळे महाराष्ट्राचा निकाल यंदा कोणाच्या बाजूने लागणार आणि सत्तेचा काटा नेमका आघाडीकडे झुकणार की महायुतीच्या बाजूने अशातही विधानसभेत कधी ७ तर कधी ८ वेळा निवडून आलेत अशा दिग्गजांना तारणार की मारक ठरणार हे पाहणे जसे औत्सुक्याचे ठरणार तसेच या दिग्गजांनाही यंदाची निवडणुक सोपी जाणार नाही हे मात्र निश्चित. (Maharashtra Assembly Election)

हेही पहा –

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.