भाषण सुरु असतानाच फटाके वाजले, Raj Thackeray म्हणाले वाजवा त्यांच्या कानाखाली फटाके

209
भाषण सुरु असतानाच फटाके वाजले, Raj Thackeray म्हणाले वाजवा त्यांच्या कानाखाली फटाके
  • विशेष प्रतिनिधी, मुंबई

चेंबूर येथे मनसे उमेदवारांच्या प्रचारासाठी गेलेल्या मनसे अध्यक्ष राज ठाकरे (Raj Thackeray) यांच्या प्रचार सभेतील भाषण टिपेला पोहोचलेले असतानाच सभेच्या ठिकाणी फटाके वाजवण्यात आले. या हे फटाके ३० सेकंदापर्यंत वाजत होते. त्यामुळे राज ठाकरे यांना आपले भाषण थांबवावे लागले. भाषण थांबवावे लागल्याने राज ठाकरे चिडले आणि म्हणाले, मुद्दामहून वाजवले का बघा. असेल तर आताच्या त्यांच्या कानाखाली वाजवा. त्यांच्या कानाखाली फटाके वाजवले तरी चालतील असा संतापच त्यांनी व्यक्त केला.

(हेही वाचा – Maharashtra Assembly Election : सलग ७ ते ८ वेळा निवडून येणाऱ्या दिग्गजांनाही यंदाची निवडणूक सोपी नाही)

चेंबूर आणि अणुशक्ती नगर विधानसभेतील सभेचे मनसेचे उमेदवार माऊली थोरवे आणि नवीन आचार्य यांच्या प्रचारासाठी घेतलेल्या सभेत राज ठाकरे (Raj Thackeray) यांनी ही मंडळी कोण आहे आणि त्यांचा उद्देश काय आहे हे लक्षात घ्या असे सांगितले. नवीन आचार्य यांच्यासमोर समोर जी दोन माणसे उभी आहेत त्यांच्याकडे साधेपणाने पाहू नका. ही माणसे कमी नाहीत. उद्या ही माणसे बसली की तुमचे काही खरे नाही. बाहेरुन आलेले मुसलमान, म्यॅनमारमधून आलेले मुसलमान यांची संख्या आता वाढली आहे. येथील त्यांचे मोहल्ले पोलिसांना माहित आहे, पण ते काहीही करू शकणार नाही. ही माणसे घुसली आहे.

(हेही वाचा – कर्नाटकातील परिस्थिती देश अनुभवतोय, मात्र महाराष्ट्र आपल्या हाती; Amit Shah यांचे मतदारांना आवाहन)

लक्षात घ्या जर त्या प्रतिस्पर्धी उमेदवांना निवडून दिला तर अणुशक्ती नगर, चेंबूर बरबाद होईल. या चेंबूर, अणशुक्ती नगर येथे भाभा ऑटोमिक न्युक्लियर सेंटर आहे, आपणच जर बेसावध राहिलो तर उरणार काय? त्यामुळे अणुशक्ती नगरमध्ये त्या दोन माणसांना थारा देऊ नका, नवीन आचार्य याला निवडून द्या असे आवाहन त्यांनी केले. ही माणसे राष्ट्रवादी असूच शकत नाही. अणुशक्ती नगर सुरक्षित ठेवायचे असेल तर सर्व हिंदुंनी जाणीवपूर्वक मतदान करायला हवे, असेही आवाहन त्यांनी केले. यावेळी राज ठाकरे (Raj Thackeray) यांनी १९९३ च्या बॉम्बस्फोट हल्ल्याचे स्मरण करून देत ही मंडळी इथे आपल्यासोबत राहत असली तरी ते धर्माच्या पलिकडे काहीच पाहत नाही, अशी भीती त्यांनी व्यक्त केली.

हेही पहा –

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.