Jammu and Kashmir येथे परदेशी दहशतवादी मोठ्या प्रमाणावर सक्रिय असल्याची माहिती समोर आली आहे. राज्यात 119 दहशतवादी सक्रिय असल्याचे गुप्तचर यंत्रणांचे म्हणणे आहे. त्यापैकी 79 पीर पंजालमध्ये आहेत. त्यापैकी 18 स्थानिक तर 61 पाकिस्तानी आहेत. पीर पंजालच्या दक्षिणेस 40 सक्रिय दहशतवादी आहेत. त्यापैकी 34 पाकिस्तानी नागरिक आहेत, तर केवळ 6 स्थानिक दहशतवादी आहेत.
या दहशतवाद्यांच्या कारवाया आणि भरती करण्याच्या पद्धतींमध्येही बदल होताना दिसत आहेत. सीमेवर घुसखोरी करण्याऐवजी अंतर्गत भागात दहशतवादी हल्ले करत आहेत. चालू वर्षात आतापर्यंत 25 दहशतवादी घटना घडल्या आहेत. या घटनांमध्ये 24 जवान हुतात्मा झाले असून गेल्या वर्षी 27 जवान हुतात्मा झाले होते. या वर्षी 61 दहशतवादीही मारले गेले. त्यापैकी 45 अंतर्गत भागात आणि 16 नियंत्रण रेषेवर मारले गेले. यापैकी 21 पाकिस्तानी होते. Jammu and Kashmir
(हेही वाचा कर्नाटकातील परिस्थिती देश अनुभवतोय, मात्र महाराष्ट्र आपल्या हाती; Amit Shah यांचे मतदारांना आवाहन)
उत्तर कमांडचे प्रमुख लेफ्टनंट जनरल एमव्ही सुचिंद्र कुमार यांनी मंगळवारी व्हाइट नाइट कॉर्प्स जम्मूला भेट दिली. त्यांनी येथे लष्करी ऑपरेशनल तयारीचा आढावा घेतला. नॉर्दर्न कमांडच्या प्रमुखांनी सुरक्षा दलांना दहशवाद्यांविरोधात सावधगिरीने कारवाई तीव्र करण्याचे निर्देश दिले. जीओसी-इन-सी यांची ही भेट महत्त्वाची मानली जात आहे, कारण गेल्या पाच दिवसांपासून दहशतवादी घटनांमध्ये सातत्याने वाढ होत आहे. या काळात किश्तवाडमधील दोन घटनांमध्ये एक जेसीओ हुतात्मा झाला, तर दोन ग्राम संरक्षण रक्षक दहशतवाद्यांनी मारले. दहशतवाद्यांच्या शोधासाठी लष्कर विशेष मोहीम राबवत आहे. Jammu and Kashmir
Join Our WhatsApp Community