Crime News : बिहारच्या तरुणाचा सापडला ७ तुकड्यात मृतदेह; प्रेयसीच्या भावाला अटक

290
Crime News : बिहारच्या तरुणाचा सापडला ७ तुकड्यात मृतदेह; प्रेयसीच्या भावाला अटक
Crime News : बिहारच्या तरुणाचा सापडला ७ तुकड्यात मृतदेह; प्रेयसीच्या भावाला अटक
बिहार येथून आलेल्या तरुणाची हत्या करून त्याच्या मृतदेहाचे ७ तुकडे करून बोरीवलीतील गोराईच्या जंगलात फेकून दिल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. ही हत्या मृत तरुणाच्या प्रेयसीच्या भावाने केल्याचे तपासात उघडकीस आले असून गोराई पोलिसांनी नालासोपारा येथे राहणाऱ्या प्रेयसीच्या भावाला अटक केली आहे. मागील १५ दिवसापासून बेपत्ता असलेल्या मुलाच्या शोधात आलेल्या पित्याने या घटनेला ‘लव्ह जिहाद’ असल्याचा आरोप केला असून मुलाच्या हत्येत मुलीचे संपूर्ण कुटूंब सामील असल्याचे मृत तरुणाच्या पित्याने  आरोप केला आहे. (Crime News)
रघुनंदन पासवान (२२) असे मृत तरुणाचे नाव असून, रघुनंदन हा मूळचा बिहार राज्यात राहणारा आहे. रघुनंदन याचे बिहार मध्ये १७ वर्षीय मुलीसोबत प्रेमप्रकरण सुरू होते. दोघे वेगळ्या धर्माचे असल्यामुळे मुलीच्या कुटूंबियांना याला विरोध केला होता, व मुलाला धमकी दिली होती. या घटनेनंतर गावातील मुखींयांनी मध्यस्थी करून हे प्रकरण मिटवले होते, रघुनंदनच्या वडिलांनी त्याला पुण्यात नातेवाईकाकडे पाठवले होते. (Crime News)
रघुनंदन पासवान याचा मोबाईल ३१ ऑक्टोबर पासून बंद असल्यामुळे त्याचे वडील त्याचा शोध घेत बिहार येथून पुण्याला आले होते, तेथून कळले की तो मुंबईला फिरण्यासाठी गेला होता, त्यानंतर त्याचे वडील अंधेरी येथे एका नातेवाईकाकडे आले व त्यांनी अंधेरी पोलीस ठाण्यात हरवल्याची तक्रार दाखल केली होती. (Crime News)
गोराई पोलिसाकडून  मुंबईतील हरविलेल्या व्यक्तीचा माहिती काढत असताना अंधेरी पोलीस ठाण्यात दाखल असलेल्या मिसिंग तक्रारीची माहिती घेऊन नातेवाईकांना बोलावून घेतले, दरम्यान गोराई पोलिसांनी तक्रारदार यांना मृतदेहाच्या हातावरील टॅटू दाखवला असता त्यांनी तो ओळखला, पोलिसांनी मृतदेहाची ओळख पटवून तपास सुरू केला असता  वडिलांनी दिलेल्या माहितीवरून नालासोपरा येथे राहणाऱ्या एका मुस्लिम तरुणाला ताब्यात घेऊन त्याच्याकडे चौकशी केली असता रघुनंदन आणि ताब्यात घेण्यात आलेल्या तरुणाच्या बहिणीचे बिहारमध्ये  प्रेमप्रकरण सुरू होते.परंतु दोघांचा धर्म वेगळा असल्यामुळे दोघांच्या कुटूंबियांना त्याला मान्यता दिली नाही, त्यातून गावात वाद झाला, हा वाद मिटवून रघुनंदनच्या वडिलांनी रघुनंदन याला पुण्यात एका नातेवाईकडे नोकरीसाठी पाठवले होते. (Crime News)
काही महिन्यांनी मुलीच्या कुटूंबियांनी मुलीला नालासोपारा येथे भावाकडे पाठवले होते, मुलीकडे मोबाईल फोन नसल्यामुळे ती भावाच्या मोबाईल वरून रघुनंदन याला चोरून फोन करीत असे,  अनेक महिने हा प्रकार सुरू होता. ३१ ऑक्टोबर रोजी रघुनंदन पुण्याहून काही मित्रांसोबत मुंबईत फिरण्यासाठी आला होता, ३१ ऑक्टोबर रोजी रघुनंदन याने दारूच्या नशेत आपल्या प्रेयसीला तिच्या भावाच्या मोबाईलवर फोन केला, नेमका फोन मुलीच्या भावाने उचलला आणि या दोघे एकमेकांच्या अद्याप ही एकमेकांच्या संपर्कात असल्याचे लक्षात येताच मुलीचा भाऊ संतापला आणि त्याने गोड गोड बोलून रघुनंदनला १ नोव्हेंबर रोजी नालासोपारा येथे बोलून घेतले, त्या ठिकाणी त्याला दारू पाजून नशेत नशेत त्याची हत्या करून मृतदेहाचे सात तुकडे केले, आणि हे तुकडे रंगाच्या रिकाम्या बकेट मध्ये भरून बकेट गोणीत भरून गोणी रिक्षाने गोराई येथे घेऊन आला, शेफाली दरिया किनारा येथील झुडपात फेकून दिला होता. (Crime News)
गोराई पोलिसांनी या हत्येप्रकरणी रघुनंदन याच्या प्रेयसीच्या भावाला अटक केली आहे. दरम्यान रघुनंदन याच्या वडिलांनी हा लव्ह जिहादचा प्रकार असल्याचा आरोप केला आहे. (Crime News)
हेही पहा- 
Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.