Shivaji Park वरील भाजपच्या सभा रद्द झाल्याने दोन दिवस शिल्लक, मनसेच्या आशा पल्लवित

691
Shivaji Park वरील भाजपच्या सभा रद्द झाल्याने दोन दिवस शिल्लक, मनसेच्या आशा पल्लवित
Shivaji Park वरील भाजपच्या सभा रद्द झाल्याने दोन दिवस शिल्लक, मनसेच्या आशा पल्लवित
  • सचिन धानजी,मुंबई

छत्रपती शिवाजी महाराज उद्यान अर्थात शिवाजी पार्कमध्ये गुरुवारी १४ नोव्हेंबरला देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या उपस्थितीत महायुतीची प्रचार सभा होत आहे. मात्र, याच शिवाजीपार्कवर उबाठा शिवसेना व मनसेच्या सभांनाही परवानगी मिळावी म्हणून दोन्ही ठाकरेंकडून प्रयत्न सुरु आहेत. शिवाजीपार्कवर शिवसेना आणि भाजपाकडून अनुक्रमे १० आणि १२ नोव्हेंबरला सभा न झाल्याने हे दोन्ही दिवस शिल्लक राहिले असून अर्ज क्रमवारीत मनसेचा अर्ज असल्याने मनसेच्या सभेसाठी कोणता दिवस दिला जावा यावर नगरविकास खात्याकडून  विचार सुरु आहे. (Shivaji Park)

विधानसभा निवडणुकीच्या प्रचारसभेसाठी दादर छत्रपती शिवाजी महाराज उद्यानातील जागेसाठी शिवसेनेकडून १० नोव्हेंबर करता, भाजपाकडून १२ नोव्हेंबर करता आणि राष्ट्रवादी काँग्रेसकडून १४ नोव्हेंबर करता अर्ज केला होता. हे  तिन्ही अर्ज मंजूर करण्यात आले होते. त्यानुसार १४ नोव्हेंबरला महायुतीची प्रचार सभा शिवाजीपार्कवर होत आहे. परंतु यापूर्वी मैदान बूक केलेल्या शिवसेना आणि भाजपाच्या सभा झालेल्या नाहीत.  (Shivaji Park)

(हेही वाचा- Jalgaon : गरोदर महिलेला घेऊन जाणाऱ्या ॲम्बुलन्समध्ये स्फोट; चालकामुळे वाचले रुग्णाचे प्राण)

शिवाजी पार्क मैदानात ३९ दिवस हे विविध सभा आणि कार्यक्रमांसाठी दिले जाऊ शकतात. आणि राज्य शासन तथा सरकारच्या अधिकारात  सहा दिवसांची परवानगी दिली जाते. त्यातील राज्य शासन तथा राज्य सरकारच्या अखात्यात येणारे सहा दिवसांची परवानगी घेवून त्यांचा वापर झालेला आहे. त्यामुळे सहा दिवसांचा कोटा संपलेला आहे. तर  त्याव्यतिरिक्त जो ३९ दिवसांची परवानगी देण्याची तरतूद आहे, त्यातील ३ दिवसच शिल्लक आहेत. त्यामुळे या शिल्लक दिवसाचा विचार करून महापालिकेने पहिल्या तीन अर्जांचा विचार केला आहे. त्यानुसार शिवसेना, भाजपा आणि राष्ट्रवादी काँग्रेस यांच्या सभांना परवानगी मिळाली. (Shivaji Park)

 परंतु, १० नोव्हेंबर आणि १२ नोव्हेंबरला शिवसेना आणि भाजपा पक्षासाठी मंजूर केलेल्या सभा न झाल्याने पुन्हा शिवाजीपार्कवरील सभा आणि कार्यक्रमांसाठी दोन दिवस शिल्लक राहिले आहेत. निवडणूक अधिकाऱ्यांनी या दोन्ही दिवशी सभा न झाल्याचे पत्र महापालिकेला सादर केल्यानंतर त्याचा अहवाल महापालिकेने नगरविकास खात्याला सादर केले जात आहे. दोन दिवस शिल्लक असल्याने क्रमवारीत मनसेकडून जाहीर सभेसाठी अर्ज आल्याने मनसेला मैदान मिळण्याचा मार्ग खुला झाला आहे. (Shivaji Park)

(हेही वाचा- Manipur मध्ये जिरिबाम हल्ल्यानंतर CAPF च्या 20 तुकड्या तैनात; इम्फाळ खोऱ्यातील 5 जिल्हे बंद)

गुरुवारी १४ नोव्हेबरला महायुतीची सभा असल्याने या सभेचा मंडप काढण्यासाठी एक दिवसाचा कालावधी अपेक्षित आहे. त्यानंतर पुढील सभेसाठी मंडप उभारण्यास एक ते दीड दिवसाचा कालवधी अपेक्षित आहे. त्यामुळे  १५ आणि १६ नोव्हेबरच्या तारखा वगळल्या तर मनसेसाठी १७ नोव्हेंबरची शिल्लक राहते. मात्र,  १७ नोव्हेंबरला स्वर्गीय शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचा स्मृतीदिन असून त्यादिवशी शिवसैनिकांकडू स्मृतीस्थळावर होणारी गर्दी लक्षात घेता नगरविकास खात्याकडून या दिवशी परवानगी मिळण्याची शक्यता कमी आहे. त्यामुळे मनसेला आता कोणत्या अटीवर ही परवानगी दिली जाते की बाळासाहेबांचा स्मृतीदिनाचे कारण देऊन टाळले जाते याकडे सर्वांचे लक्ष आहे.  (Shivaji Park)

हेही पहा- 

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.