Ind vs SA, 3rd T20 : रममदीप सिंगचा पदार्पणातच एक अनोखा विक्रम

Ind vs SA, 3rd T20 : आंतरराष्ट्रीय टी-२० च्या पदार्पणाच्या चेंडूवर रमणदीपने षटकार ठोकला 

133
Ind vs SA, 3rd T20 : रममदीप सिंगचा पदार्पणातच एक अनोखा विक्रम
Ind vs SA, 3rd T20 : रममदीप सिंगचा पदार्पणातच एक अनोखा विक्रम
  • ऋजुता लुकतुके

युवा अष्टपैलू खेळाडू रमणदीपसाठी बुधवारचा दिवस ऐतिहासिक होता. टी-२० संघात पदार्पणाची संधी रमणदीपला मिळाली. त्याचबरोबर आपल्या पहिल्याच आंतरराष्ट्रीय चेंडूवर षटकार ठोकण्याची किमया त्याने साधली. यापूर्वी सध्याचा कर्णधार सूर्यकुमार यादवने आपल्या पहिल्याच चेंडूवर षटकार ठोकला होता. २०२१ मध्ये इंग्लंड विरुद्ध अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडिअमवर सूर्यकुमारने हा विक्रम साध्य केला होता. (Ind vs SA, 3rd T20)

(हेही वाचा- Maharashtra Vidhansabha Election 2024: ‘Vote Jihad’ प्रकरणी पोलिसांची धडक कारवाई; दोघांच्या आवळल्या मुसक्या)

बुधवारी सामना सुरू होण्यापूर्वी रमणदीपला अष्टपैलू खेळाडू हार्दिक पांड्याच्या हस्ते भारतीय संघाची जर्सी आणि कॅप प्रदान करण्यात आली. ‘असा प्रसंग आयुष्यात नेहमी येत नाहीत. त्यामुळे ही आठवण जप,’ असं हार्दिकने तेव्हा रमणदीपला सांगितलं. आमि रमणने आपल्या ज्येष्ठ संघ सहकाऱ्याचा सल्ला अगदी शब्दश: जपला.  (Ind vs SA, 3rd T20)

आफ्रिकन गोलंदाज साईमलेनने यॉर्कर टाकण्याचा प्रयत्न केला. पण, त्याचा टप्पा चुकला. त्याचा फायदा घेत रमणदीपने लाँग ऑनला एक मोठा षटकार ठोकला. भारतीय डावातील फक्त दोन षटकं बाकी असताना रमण फलंदाजीला आला आणि मिळालेल्या संधीचं चीज करताना त्याने ६ चेंडूंत १५ धावा केल्या. चोरट्या धावेच्या प्रयत्नांत क्लासेनने तयाला धावचित पकडलं. पण, तोपर्यंत रमणने आपलं काम केलं होतं. (Ind vs SA, 3rd T20)

(हेही वाचा- Ind vs SA, 3rd T20 : द आफ्रिकेचा ११ धावांनी पराभव करत भारताची मालिकेत २-१ ने आघाडी)

संजू सॅमसन वगळता अन्य भारतीय फलंदाजांनी दिलेल्या उपयुक्त योगदानांमुळे भारतीय संघाने २० षटकांत ६ बाद २१९ अशी धावसंख्या उभारली. दक्षिण आफ्रिकेचा ११ धावांनी पराभव करत मालिकेत २-१ ने आघाडी घेतली आहे. (Ind vs SA, 3rd T20)

हेही पहा- 

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.