अनाथांची माय बनून अनेकांचा सांभाळ करणाऱ्या Sindhutai Sapkal

97
अनाथांची माय बनून अनेकांचा सांभाळ करणाऱ्या Sindhutai Sapkal
अनाथांची माय बनून अनेकांचा सांभाळ करणाऱ्या Sindhutai Sapkal

सिंधूताई सपकाळ या भारतीय सामाजिक कार्यकर्त्या होत्या. सिंधूताई विशेषतः अनाथ मुलांचे संगोपन करण्यासाठी ओळखल्या जातात. २०२१ साली त्यांना पद्मश्री पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आलं. तसंच त्यांना सामाजिक कार्य श्रेणीतल्या इतर अनेक पुरस्कारांनी सन्मानित करण्यात आलं होतं. (Sindhutai Sapkal)

(हेही वाचा- Ind vs SA, 3rd T20 : द आफ्रिकेचा ११ धावांनी पराभव करत भारताची मालिकेत २-१ ने आघाडी)

सिंधूताईंचा जन्म १४ नोव्हेंबर १९४८ साली वर्धा जिल्ह्यातल्या पिंपरी मेघे येथे झाला. एक अवांछित मुलगी असल्यामुळे त्यांना ‘चिंधी’ म्हणून हाक मारली जायची. त्यांच्या घरची परिस्थिती अत्यंत गरिबीची होती. लहानपणीच त्यांच्यावर अनेक कौटुंबिक जबाबदाऱ्यांचं ओझं येऊन पडलं होतं. त्यात सर्वात कहर म्हणजे बारा वर्षाच्या लहान वयातच त्यांच्यापेक्षा वीस वर्षांनी मोठ्या असलेल्या माणसाशी त्यांचं लग्न लावून देण्यात आलं. लग्न झाल्यामुळे चौथी इयत्ता यशस्वीपणे पार पाडली असूनही त्यांचं औपचारिक शिक्षण सोडवलं गेलं. (Sindhutai Sapkal)

लग्नानंतर सिंधूताई वर्धा जिल्ह्यातल्या नवरगाव, सेलू येथे राहायला गेल्या. त्यांचं लग्न फार काळ टिकलं नाही. वयाच्या विसाव्या वर्षी त्यांच्या पतीने त्यांना आपल्या लहान मुलीसकट हिंसकपणे घरातून बाहेर हाकलून दिलं. (Sindhutai Sapkal)

(हेही वाचा- Maharashtra Vidhansabha Election 2024: ‘Vote Jihad’ प्रकरणी पोलिसांची धडक कारवाई; दोघांच्या आवळल्या मुसक्या)

सिंधूताईंनी अन्नासाठी भीक मागायला सुरुवात केली. असेच दिवस जात असताना त्यांच्या लक्षात आलं की, पालकांनी सोडलेली अनेक मुलं भीक मागून जगत आहेत. या मुलांना त्यांनी स्वतःचं मूल म्हणून दत्तक घेतलं. हळूहळू त्यांनी सांभाळ केलेल्या मुलांचं कुटुंब मोठं व्हायला लागलं. सगळ्यांची पोटं भरण्यासाठी त्यांना आणखी भीक मागावी लागली. सिंधुताईंनी त्यांच्याकडे अनाथ म्हणून आलेल्या प्रत्येकाची आई होण्याचा निर्णय घेतला. पुढे त्यांनी स्वतःची मुलगी पुण्याच्या श्रीमंत दगडू शेठ हलवाई ट्रस्टकडे सांभाळायला दिली. कारण स्वतःचं मूल आणि दत्तक घेतलेल्या इतर मुलांमध्ये त्यांच्याकडून भेदभाव होऊ नये, अशी त्यांची भावना होती. (Sindhutai Sapkal)

सिंधूताई सपकाळ यांनी चौऱ्याऐंशी गावांच्या पुनर्वसनासाठी लढा दिला. आंदोलनादरम्यान त्यांनी तत्कालीन वनमंत्री छेदिलाल गुप्ता यांची भेट घेतली. सरकारने पर्यायी जागेवर योग्य ती व्यवस्था करण्यापूर्वी गावकऱ्यांना विस्थापित करू नये, असे त्यांनी सिंधूताईंच्या विनंतीवरून मान्य केलं. तत्कालीन पंतप्रधान इंदिरा गांधी व्याघ्र प्रकल्पाच्या उद्घाटनासाठी तिथे गेल्या तेव्हा सिंधुताईंनी त्यांना वन्य अस्वलामुळे डोळे गमावलेल्या आदिवासीचे फोटो दाखवले आणि त्याला नुकसान भरपाई मिळवून दिली. (Sindhutai Sapkal)

(हेही वाचा- Ind vs SA, 3rd T20 : तिलक वर्मा टी-२० मधील सर्वात लहान शतकवीर )

अनाथ आणि परित्यक्त आदिवासी मुलांच्या दुरवस्थेची माहिती मिळाल्यानंतर सिंधूताईंनी तुटपुंज्या अन्नाच्या मोबदल्यात त्या मुलांची काळजी घेतली. त्यानंतर लवकरच अनाथांची माता होणं हे त्यांच्या आयुष्याचं ध्येय बनलं. (Sindhutai Sapkal)

हेही पहा- 

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.