आमच्या विरोधात निवडणूक लढवणाऱ्या बाळ माने यांनी एक खेळी करण्याचा प्रयत्न केला. त्यानुसार आम्हाला भाजपाचा (BJP) पाठिंबा आहे, ते आम्हाला आतून सपोर्ट करणार आहेत असे चुकीचे पसरवले जात आहे; मात्र आम्ही स्पष्टपणे सांगतो की ही सर्व चुकीची माहिती पसरवली जात असून आम्ही तालुक्यात सर्वत्र फिरून हे गैरसमज दूर करतोय. बाळ माने हे आमच्या पक्षाच्या विचारधारेच्या विरोधात आहेत. त्यामुळे त्यांना विरोध करणे हे आमचे काम आहे, यासाठी आम्ही मोहीम देखील सुरू केली आहे असे वक्तव्य भाजपाचे जेष्ठ नेते ॲड. बाबा परुळेकर यांनी पत्रकार परिषदेत बोलताना केले आहे.
(हेही वाचा Raj Thackeray ची वरळीकरांना गॅरंटी, आमचा आमदार आला तर अपॉईंटमेंटशिवाय भेटता येईल)
महायुतीकडून उदय सामंत यांना उमेदवारी मिळालेली आहे. भाजपा (BJP) पूर्णपणे महायुतीच्या उमेदवाराच्या पाठीशी उभी आहे, प्रचारातही सहभागी आहे. यासाठी जिल्ह्याचे मार्गदर्शक रवींद्र चव्हाण यांनी वेळोवेळी बैठका घेऊन तशा सूचना दिलेल्या आहेत. विरोधी पक्षाने याही वेळेला एक खेळी खेळली आहे. भाजपाचा आम्हाला आतून पाठिंबा आहे, असे विरोधकांनी पसरवण्याचा फेक नॅरेटिव्ह पसरवण्याचा प्रयत्न सुरु झाला आहे. बाळ माने यांना तिकीट मिळावे म्हणून आम्ही प्रयत्न केला होता पण आता ते विरोधी विचाराच्या पक्षामध्ये आहेत, त्यामुळे त्यांना विरोध करणे हे आमचे कर्तव्य बनले आहे, असे ॲड. बाबा परुळेकर म्हणाले.
Join Our WhatsApp Community