Shri krishna जन्मभूमी प्रकरणाच्या याचिकाकर्त्याला पाकिस्तानातील जिहादींकडून धमकी

44

श्रीकृष्ण (Shri krishna)जन्मभूमी प्रकरणातील मुख्य याचिकाकर्ते आणि श्रीकृष्ण जन्मभूमी मुक्ती निर्माण ट्रस्टचे अध्यक्ष आशुतोष पांडे यांना धमकी देण्यात आलीय. पांडे यांना पाकिस्तानातील जिहादींनी धमकावले असून अलाहबाद हायकोर्ट बॉम्बस्फोटात उडवून देण्याचा इशारा दिलाय. याप्रकरणी पांडे यांनी पोलिसात तक्रार दाखल केली आहे.

(हेही वाचा बंद सम्राटाला कायमचे बंद करा; CM Eknath Shinde यांचा उद्धव ठाकरे यांच्यावर घणाघात

आशुतोष पांडे हे शामलील येथील कांधला येथील रहिवासी आहेत. अलाहाबाद उच्‍च न्‍यायालय बॉम्‍बने उडवून देवू, अशी धमकी त्यांना फोनवरून देण्यात आली आहे. पांडे यांना बुधवारी 13 नोव्हेंबरच्या रात्री उशिरा हा धमकीचा फोन आला होता. पांडे यांनी स्थानिक पोलिसांना या धमक्यांची माहिती दिली आणि रेकॉर्डिंग तपासासाठी सादर करण्यात आले आहे. मथुरा येथील श्रीकृष्ण (Shri krishna) जन्मभूमी स्थळाशी संबंधित अनेक कायदेशीर खटल्यांमध्ये सक्रिय सहभाग असल्याने पांडे यांना या प्रकरणात यापूर्वीही अनेक धमक्या आल्या आहेत. श्रीकृष्ण (Shri krishna) जन्मस्थान सेवा संस्थान आणि ट्रस्ट शाही मशीद ईदगाह यांच्यात 1968 मध्ये एक तडजोड करार झाला, ज्यामुळे दोन्ही प्रार्थनास्थळांना एकत्र राहण्याची परवानगी मिळाली. मात्र, तडजोड करार फसवा आणि कायदेशीररित्या अवैध असल्याचा आरोप करत विविध पक्षांनी तडजोड करारामध्ये बदल करण्याची मागणी केली. तत्पूर्वी, अलाहाबाद उच्च न्यायालयाने कृष्ण जन्मभूमी-शाही ईदगाह मशीद वादाशी संबंधित मथुरा न्यायालयासमोर प्रलंबित असलेल्या सर्व खटल्यांचे एकत्रीकरण केले आहे.

 

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.