Maharashtra Assembly Election 2024: राज्यात निवडणुकांमुळे ३ दिवस शाळा बंद राहणार? वाचा सविस्तर

79
Maharashtra Assembly Election 2024: राज्यात निवडणुकांमुळे ३ दिवस शाळा बंद राहणार? वाचा सविस्तर
Maharashtra Assembly Election 2024: राज्यात निवडणुकांमुळे ३ दिवस शाळा बंद राहणार? वाचा सविस्तर

राज्यात विधानसभा निवडणुकीसाठी (Maharashtra Assembly Election 2024) २० नोव्हेंबरला मतदान (Voting) होणार आहे. त्यानंतर २३ नोव्हेंबर ही निकालाची तारिख आहे. मतदानसाठी शाळांमध्ये मतदान केंद्र उभारण्यात आली आहेत. तसेच, शिक्षकांचाही निवडणूक प्रक्रियेतील कामकाज आणि प्रत्यक्ष मतदानाच्या प्रक्रियेत मोठा सहभाग असतो. मतदानाची तयारी करण्यासाठी निवडणूक प्रशासन शाळा ताब्यात घेते. त्या पार्श्वभूमीवर 18,19 आणि 20 नोव्हेंबर रोजी शाळांना सुट्टी देण्याचा प्रस्ताव शिक्षण आयुक्तालयाने शिक्षण विभागाला सादर केला होता. या अनुषंगाने शिक्षण विभागाचे उपसचिव तुषार महाजन यांनी परिपत्रकाद्वारे शिक्षण आयुक्तांना निर्देश दिले आहेत. (Maharashtra Assembly Election 2024)

(हेही वाचा-Supreme Court : ‘व्हॉट्सॲप’ बंद करणारी याचिका फेटाळली)

18 ते 20 नोव्हेंबर या कालावधीत शाळा भरवणे शक्य नसल्यास मुख्याध्यापकांना त्यांच्या अखत्यारित शाळा बंद ठेवण्यासंदर्भातील निर्णय घेण्यासाठी आयुक्त स्तरावरुन आवश्यक त्या सूचना निर्गमित कराव्यात, असे परिपत्रकात नमूद करण्यात आले आहे. राज्य परिवहन (आरटीओ) विभागाच्या सूचनेनुसार विधानसभा निवडणुकीच्या कामांसाठी १९ आणि २० नोव्हेंबरला स्कूल बसची आवश्यकता असल्याने या दोन दिवशी या बस विद्यार्थ्यांच्या वाहतुकीसाठी न चालविण्याचा निर्णय स्कूल बस ओनर्स असोसिएशन ऑफ महाराष्ट्र घेतला आहे. (Maharashtra Assembly Election 2024)

(हेही वाचा-Shri krishna जन्मभूमी प्रकरणाच्या याचिकाकर्त्याला पाकिस्तानातील जिहादींकडून धमकी)

मतदानामुळे शाळांना २० तारखेला सुट्टी आहे. मात्र, १९ तारखेला बसअभावी विद्यार्थ्यांना पायपीट करत, अथवा सार्वजनिक बस, रिक्षा, टॅक्सीने शाळेत ये-जा करावी लागणार आहे. या बस १८ नोव्हेंबरलाच रात्रीपासून आरटीओच्या ताब्यात देण्यात येणार आल्याने शालेय विद्यार्थ्यांच्या वाहतुकीसाठी १९ नोव्हेंबरला उपलब्ध करून देणे कठीण असल्याने हा निर्णय घेतल्याचे असोसिएशनचे अध्यक्ष अनिल गर्ग यांनी सांगितले. (Maharashtra Assembly Election 2024)

हेही पहा-

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.