इंदिरा गांधी यांनीच घटनेची केली सर्वाधिक मोडतोड; Nitin Gadkari यांचा काँग्रेसवर हल्लाबोल

40
इंदिरा गांधी यांनीच घटनेची केली सर्वाधिक मोडतोड; Nitin Gadkari यांचा काँग्रेसवर हल्लाबोल
इंदिरा गांधी यांनीच घटनेची केली सर्वाधिक मोडतोड; Nitin Gadkari यांचा काँग्रेसवर हल्लाबोल

घटनेच्या मूलभूत तत्त्वात काही महत्त्वाच्या मुद्द्यांचा समावेश केला आहे. घटनेत बदल करता येणार नाही, असा उल्लेख केलेला आहे. देशात आणीबाणी लागू झाली, तेव्हा इंदिरा गांधी (Indira Gandhi) यांनी घटनेची मोडतोड करण्याचे काम केले. त्यामुळे पुढे सत्तेवर आलेल्या जनता पक्षाला ते पूर्ववत करण्याचे काम करावे लागले. आता हीच काँग्रेस भाजप संविधान बदलणार असल्याची बिनबुडाची टीका करत आहे. संविधानात मोडतोड करण्याचे काम याच काँग्रेसने केले आहे. हे जनतेने विसरता कामा नये, असे आवाहन भाजपचे ज्येष्ठ नेते नितीन गडकरी (Nitin Gadkari) यांनी केले.

(हेही वाचा – ८० टक्के मराठा समाज हिंदुत्ववादी, कायमच हिंदुत्वाच्या बाजूने उभा; Devendra Fadnavis यांना विश्वास)

विधानसभा निवडणुकीच्या (Maharashtra Assembly Election 2024) पार्श्वभूमीवर इचलकरंजी येथे महायुतीचे उमेदवार राहुल आवाडे यांच्या प्रचारार्थ गुरुवारी झालेल्या सभेत ते बोलत होते. या वेळी त्यांनी संविधानाच्या मुद्द्यावरून भाजपवर टीका करणाऱ्या काँग्रेसचा समाचार घेतला.

नितीन गडकरी (Nitin Gadkari) पुढे म्हणाले की, सत्ता मिळाली, की त्याचा वापर विकासकामे करण्यासाठी केला पाहिजे. केंद्रात मंत्री झाल्यानंतर कोल्हापूरसह पश्चिम महाराष्ट्रातील चार जिल्ह्यांत ४७ हजार कोटींची रस्तेविकासाची कामे केली. हातकणंगले तालुक्यात ड्रायपोर्ट मंजूर झाले आहे. त्यामुळे मालवाहतूक सुलभ, स्वस्त होण्यासाठी त्याचा लाभ होईल, असा उल्लेख त्यांनी केला.

हेही पहा – 

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.