Maharashtra Assembly Election 2024: ज्येष्ठ नागरिक, दिव्यांग मतदारांचे गृह मतदान सुरू!

53
Maharashtra Assembly Election 2024: ज्येष्ठ नागरिक, दिव्यांग मतदारांचे गृह मतदान सुरू!
Maharashtra Assembly Election 2024: ज्येष्ठ नागरिक, दिव्यांग मतदारांचे गृह मतदान सुरू!

विधानसभा निवडणुकीकरिता (Maharashtra Assembly Election 2024) २० नोव्हेंबर, २०२४ रोजी मतदान (Voting) होणार आहे. मतदान केंद्रावर उपस्थित राहू शकत नसलेल्या व ८५ वर्षावरील ज्येष्ठ नागरिक (senior citizens) व दिव्यांग मतदारांना (disabled voters) टपाली मतदान पथकामार्फत गृह टपाली मतपत्रिकेद्वारे मतदानाची सुविधा उपलब्ध करुन देण्यात आली आहे. १६ नोव्हेंबर २०२४ पर्यंत गृह टपाली मतदान घेतले जाणार आहे.

(हेही वाचा-‘बटेंगे तो कटेंगे’ घोषणेला अजित पवारांचा विरोध? Devendra Fadnavis काय म्हणाले?)

या सुविधेअंतर्गत शिवडी विधानसभा मतदारसंघात (Maharashtra Assembly Election 2024) ११५ ज्येष्ठ नागरिक व १५ दिव्यांग अशा एकूण १३० मतदारांनी गृह टपाली मतदान केले. मुंबई शहर जिल्ह्यातील शिवडी विधानसभा मतदारसंघात ८५ वर्षावरील एकूण २२६ ज्येष्ठ नागरिक मतदार असून त्यापैकी ११५ मतदारांनी तर ३४ पैकी १५ दिव्यांग मतदारांनी विधानसभा मतदारसंघाचे निवडणूक निर्णय अधिकारी यांच्याकडे प्रपत्र १२ ड भरून जमा केले होते. प्रपत्र १२ ड भरून जमा केलेल्या एकूण १३० अर्जदारांचे गृह टपाली मतदान घेण्यात आले आहे.

(हेही वाचा-आदित्य ठाकरेंचं पक्षासाठी योगदान काय? Ramdas Kadam यांचा सवाल)

मलबार हिल विधानसभा मतदारसंघात २६८ ज्येष्ठ नागरिक व १० दिव्यांग अशा एकूण २७८ मतदारांनी गृह टपाली मतदान करीत कर्तव्य बजावले. लोकशाहीच्या बळकटीकरणासाठी मतदारांनी निवडणुकीत मतदानाचा हक्क बजावला पाहिजे’, असा महत्वपूर्ण संदेश या ज्येष्ठ नागरिक व दिव्यांग मतदारांनी गृह टपाली मतदान करून कृतीद्वारे इतर मतदारांना दिला आहे. (Maharashtra Assembly Election 2024)

(हेही वाचा-Maharashtra Assembly Election 2024: राज्यात निवडणुकांमुळे ३ दिवस शाळा बंद राहणार? वाचा सविस्तर)

मुंबई शहर जिल्ह्यातील मलबार हिल विधानसभा मतदारसंघात ८५ वर्षावरील एकूण २८६ ज्येष्ठ नागरिक मतदार असून त्यापैकी २६८ मतदारांनी तर ११ पैकी १० दिव्यांग मतदारांनी मलबार हिल विधानसभा मतदारसंघाचे निवडणूक निर्णय अधिकारी यांच्याकडे प्रपत्र ‘१२ ड’ भरून जमा केले होते. अशा एकूण २७८ मतदारांचे गृह टपाली मतदान घेण्यात आले आहे. (Maharashtra Assembly Election 2024)

हेही पहा-

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.