‘आम्ही हे करु’ नावाने मनसेचा जाहीरनामा (MNS Manifesto) प्रसिद्ध करण्यात आल आहे. मनसे अध्यक्ष राज ठाकरे (Raj Thackeray) यांनी वांद्रे येथील एमआयजी क्लब पत्रकार परिषद घेत मनसेचा जाहीरनामा (MNS Manifesto) प्रसिद्ध केला आहे. हा फक्त जाहीरनामा नाही तर त्यात केलेल्या घोषणा कशा पद्धतीने पूर्ण करणार? हे सुद्धा दिले आहे, असे राज ठाकरे यांनी सांगितले. महाराष्ट्र नवनिर्माण सेनेला १९ वर्ष झाले आहे. या १९ वर्षांत मनसेने काय केले? त्याची माहिती दिली आहे, असे राज ठाकरे यांनी सांगितले. (MNS Manifesto)
(हेही वाचा-Maharashtra Assembly Election 2024: ज्येष्ठ नागरिक, दिव्यांग मतदारांचे गृह मतदान सुरू!)
शिवाजी पार्कच्या सभेविषयी बोलताना राज ठाकरे (Raj Thackeray) म्हणाले, “माझी 17 तारखेला शिवाजी पार्कवरची सभा आहे, पण ती आता होती म्हणावी लागेल. करण त्यासाठी सरकारकडून जी परवानगी मिळणं आवश्यक असतं, ती अजून मिळालेली नाही. फक्त दीड दिवस सभेसाठी उरला आहे. त्यात सभा करणं कठिण झालं आहे. त्यामुळे 17 नोव्हेंबरची सभा रद्द करत आहोत.” असं मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी सांगितलं. (MNS Manifesto)
(हेही वाचा-‘बटेंगे तो कटेंगे’ घोषणेला अजित पवारांचा विरोध? Devendra Fadnavis काय म्हणाले?)
“सभेला परवानगी मिळाली नाही हे सत्य आहे. राजकारण आहे की नाही माहीत नाही. जे उमेदवार कामाला लागले आहेत. त्यांचा दिवस निघून जातो. नियोजन करण्यासाठी संधी मिळाली असती तर नियोजन करणं सोपं जातं. दीड दिवसात आता शक्य नाही. दुसऱ्या दिवशी पाच वाजता प्रचार संपतोय. मलाही वेळ मिळेल. उमेदवारांनाही वेळ मिळेल.” असं राज ठाकरे म्हणाले. (MNS Manifesto)
मनसेच्या जाहीरनाम्यात काय?
जाहिरनाम्यात पहिल्या भागात, मूलभूत गरजा आणि जीवनमान या गोष्टी आहेत. महिला, आरोग्य प्राथमिक शिक्षण, रोजगार वगैरे आहे. दुसऱ्या विभागामध्ये दळणवळण, पाण्याचे नियोजन, मोकळ्या जागा, पर्यावरण इंटरनेट या गोष्टींचा उल्लेख केला आहे. तिसरा विभाग, प्रगतीच्या संधी, राज्याचं औद्योगिक धोरण, आर्थिक धोरण, कृषी पर्यटन हे विषय आहे. चौथा मराठी अस्मिता, मराठीचा दैनंदिन वापर, डीजिटल युगात मराठी, गड किल्ले संवर्धन आदी विषयांना आम्ही हात लावला आहे. या गोष्टी कशा सोडवू शकतो त्याचा उपायही दिला आहे. आम्ही डिटेल्समध्ये काम केलं आहे, ते देखील पाहा असे राज ठाकरे यांनी यावेळी म्हटलं आहे. (MNS Manifesto)
हेही पहा-
Join Our WhatsApp Community