येत्या २० नोव्हेंबरला महाराष्ट्रात विधानसभा निवडणुकीसाठी (Maharashtra Assembly Election 2024) मतदान होणार आहे. यासाठी सर्व पक्ष प्रचारात व्यस्त आहेत. राज्यात कोणाचं सरकार येणार, हे चित्र काही दिवसांत स्पष्ट होईल. आम्ही १८० पेक्षा जास्त जागून जिंकून येऊ असं महाविकास आघाडीने म्हटलं आहे. तर दुसरीकडे आमचं सरकार येईल असा विश्वास महायुतीने व्यक्त केला आहे. या पार्श्वभुमीवर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी महत्त्वाची विधानं केली आहेत.
(हेही वाचा-MNS Manifesto : विधानसभेसाठी मनसेचा जाहीरनामा प्रसिद्ध! जाहीरनाम्यात वेगळं काय?)
व्होट जिहादच्या (Vote Jihad) मुद्द्यावर बोलताना फडणवीस (Devendra Fadnavis) म्हणाले, “पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी जो नारा दिला आहे की, एक है तो सेफ है तो योग्यच आहे. भारत जोडो नावाचा एक समुदाय तयार करण्यात आला. त्यातले लोक भारत जोडोसाठी नाही तर देश तोडण्याचं काम करत आहेत. आपला देश जात, धर्म यात जेव्हा वाटला गेला तेव्हा गुलाम झाला. त्यामुळे बटेंगे तो कटेंगे हा देशाचा इतिहास आहे, यात आक्षेपार्ह काहीही नाही. महायुतीसमोर फक्त व्होट जिहाद हीच समस्या आहे.”
(हेही वाचा-‘बटेंगे तो कटेंगे’ घोषणेला अजित पवारांचा विरोध? Devendra Fadnavis काय म्हणाले?)
“कुठल्याही एका उद्देशाने एकत्र येत आहात तर चांगली गोष्ट आहे. मात्र लोकसभेत व्होट जिहाद पाहण्यास मिळाला. धर्मस्थळांवर मतं द्या म्हणून बॅनर लावण्यात आली. महाविकास आघाडीला मत दिलं नाही तर अल्लाशी बेईमानी होईल सांगण्यात आलं. माझा तमाम सेक्युलरवाद्यांना सवाल आहे, ही कुठली धर्मनिरपेक्षता आहे? लोकांना शपथा घ्यायला लावल्या. त्याचा उद्देश काय? मोदींना हरवणं इतकंच. कुठल्या हिंदू पुजाऱ्यांनी सांगितलं की, भाजपाला मतं द्या नाहीतर रामाशी, देवाशी बेईमानी होईल ? लोकसभेनंतर जी परिस्थिती तयारी झाली होती, ती आता नाही.” असंही देवेंद्र फडणवीस ( Devendra Fadnavis ) म्हणाले.
(हेही वाचा-शरद पवारांच्या पत्रामुळेच २०१९ मध्ये राष्ट्रपती राजवट लागू झाली; Devendra Fadnavis यांचा गौप्यस्फोट)
“महाविकास आघाडी मुस्लिम उलेमांचे तळवे चाटण्याचं काम करते आहे. त्यातली एक मागणी अशी आहे की २०१२ ते २०२४ या कालावधीत ज्या दंगली झाल्या त्यात मुस्लिमांवर जे गुन्हे आहेत ते मागे घेतले जातील ही मागणी यात करण्यात आली आहे. आता माझा प्रश्न आहे की हे कुठलं राजकारण आहे? दंगलखोरांना बरोबर घेऊन महाविकास आघाडी लढत असेल तर आम्ही बटेंगे तो कटेंगे ही घोषणा दिली त्यात गैर काय?” असा सवालही फडणवीसांनी (Devendra Fadnavis) केला.
हेही पहा-
Join Our WhatsApp Community