Champions Trophy 2025 : चॅम्पियन्स करंडकाचे यजमान म्हणून आयसीसीच्या व्हिडिओत पाकिस्तानच

Champions Trophy 2025 : सध्या भारताच्या स्पर्धेतील सहभागावरून स्पर्धेवरच अनिश्चिततेचं सावट आहे.

34
Champions Trophy 2025 : चॅम्पियन्स करंडकाचे यजमान म्हणून आयसीसीच्या व्हिडिओत पाकिस्तानच
  • ऋजुता लुकतुके

आयसीसीने अलीकडेच चॅम्पियन्स करंडक स्पर्धा २०२५ चा प्रमोशनल व्हीडिओ प्रसिद्ध केला आहे आणि त्यात पाकिस्तानच स्पर्धेचा यजमान देश दाखवण्यात आला आहे. त्यामुळे एकप्रकारे आयसीसीने पाकिस्तानच्या यजमानपदावर शिक्कामोर्तब केल्यासारखंच आहे आणि आयसीसीने या व्हिडिओ प्रदर्शनासाठी एक जाहीर कार्यक्रमही ठेवला होता. पण, भारतीय संघाच्या सहभागावरून अनिश्चितता वाढत गेली आणि आता स्पर्धा नेमकी कुठे, कधी आणि कशी होणार याबद्दल कुठलीही ठोस स्पष्टता नाही. असं वातावरण असताना आयसीसीने आता व्हिडिओ मात्र प्रसिद्ध केला आहे आणि एकप्रकारे पाकिस्तानसाठी ही मोठी दिलासादायक गोष्ट आहे. (Champions Trophy 2025)

स्पर्धेचा नवीन लोगो आणि इतर डिझाईनिंगही यावेळी प्रसिद्ध करण्यात आलं आहे आणि आयसीसीच्या मते हा लोगो-धाडसी, जोरदार, आत्मविश्वासपूर्ण आणि मजेशीर अशा गुणांचं प्रतीक असलेला आहे. क्रिकेटच्या मैदानावर आवडत्या खेळाडूंचं यश साजरं करतानाचे, फलंदाजाचा बळी मिळवल्यानंतरचे आवाज स्पर्धेच्या नवीन व्हिडिओत वापरण्यात आले आहेत. तसंच खेळाडूंच्या जर्सीवर असलेलं त्याचं नाव अधोरेखित करण्यात आलं आहे. (Champions Trophy 2025)

(हेही वाचा – स्वतःचा पक्ष काढणारे Sharad Pawar दुसऱ्यांना गद्दार म्हणत आहेत; संभाजीराजे छत्रपती यांचा टोला)

या प्रोमोमुळे चॅम्पियन्स करंडक स्पर्धा पाकिस्तानमध्येच होणार हा विश्वास आयसीसीने व्यक्त केला असला तरी आयोजनाची आव्हानं अजून संपलेली नाहीत. भारतीय संघाने पाकिस्तानमध्ये प्रवास करण्यासाठी नकार दिला आहे. त्यासाठी १९९६ मध्ये इंग्लंड आणि ऑस्ट्रेलिया संघांनी श्रीलंकेत प्रवास करण्यासाठी मनाई केली होती. तसंच दक्षिण आफ्रिकेनं झिंबाब्वेत प्रवास करण्यासाठी नकार दिला होता, ती उदाहरणं भारताने समोर केली आहेत. (Champions Trophy 2025)

तर आयसीसीनेही कुठल्याही संघाला सहभागाची सक्ती करता येणार नाही, अशी भूमिका स्पष्ट केली आहे. तर भारताने सहभागासाठी हायब्रीड मॉडेलची मागणी केली आहे. त्यावर पाकिस्तानने अजून आपलं मत व्यक्त केलेलं नाही. पाक सरकारचं याविषयी भारत सरकारशी कुठलीही चर्चा झाली नसल्याचं मात्र पाककडून स्पष्ट करण्यात आलं आहे. (Champions Trophy 2025)

हेही पहा –

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.