Virat Kohli : बोर्डर-गावस्कर चषकात ‘हे’ विक्रम विराट कोहली मोडू शकेल

Virat Kohli : विराट कोहली फलंदाजीतील अनेक विक्रमांच्या उंबरठ्यावर उभा आहे.

31
Virat Kohli : बोर्डर-गावस्कर चषकात ‘हे’ विक्रम विराट कोहली मोडू शकेल
  • ऋजुता लुकतुके

भारताचा स्टार फलंदाज विराट कोहलीला (Virat Kohli) फॉर्म गवसण्याच्या दृष्टीनेही बोर्डर-गावस्कर चषक महत्त्वाचा आहे. तसंच फलंदाजीतील काही महत्त्वाच्या विक्रमांच्या तो जवळ उभा आहे. शिवाय ऑस्ट्रेलियात विराट नेहमीच दमदार कामगिरी करतो. त्यामुळे यंदाही या मालिकेच्या निमित्ताने त्याला सूर सापडेल अशी चाहत्यांना अपेक्षा आहे. शिवाय काही कसोटीतील विक्रम विराटला सध्या खुणावत आहेत आणि ते तो इथं सर करू शकला तर भारतीय संघालाही मालिकेत त्याचा उपयोग होणार आहे.

(हेही वाचा – “महायुतीसमोर व्होट जिहाद ही एकच समस्या”: Devendra Fadnavis)

  • विराटला (Virat Kohli) एक महत्त्वाचा विक्रम खुणावतोय तो सचिन तेंडुलकरच्या १,८०९ धावांचा. ऑस्ट्रेलियन भूमीवर भारतीय फलंदाजाने केलेल्या या सर्वाधिक धावा आहेत आणि तो विक्रम आपल्या नावावर करण्यासाठी त्याला फक्त ४५७ धावा हव्या आहेत. सध्या विराटने ऑस्ट्रेलियात ५४ धावांच्या सरासरीने १,३५२ धावा केल्या आहेत.
  • विराटने ऑस्ट्रेलियात ६ कसोटी शतकं ठोकली आहेत आणि या बाबतीत तो इंग्लंडचे जॅक हॉब्ज (९) आणि वॉली हेमंड्स (७) यांच्या मागे आहे. आणखी तीन शतकं झाली तर ऑस्ट्रेलियन भूमीवर सर्वाधिक शतकं ठोकणारा परदेशी खेळाडू बनण्याची संधी विराटकडे आहे.
  • ॲडलेड ओव्हल हे विराट कोहलीचं सगळ्यात आवडतं ऑस्ट्रेलियातील मैदान आहे. ४ कसोटी सामन्यांमध्ये त्याने इथं ५०९ धावा केल्या आहेत. आणखी १०२ धावा केल्या की, तो ब्रायन लाराच्या ६१० धावांना मागे टाकू शकतो आणि त्याचबरोबर ॲडलेड ओव्हल या जगप्रसिद्ध मैदानावर सर्वाधिक धावा करणारा परदेशी फलंदाज तो ठरू शकतो.
  • फक्त शतकंच नाहीत तर अर्धशतकं किंवा त्यापेक्षा जास्त धावा एका डावांत करण्याच्या बाबतीतही विराटला (Virat Kohli) एक अनोखा विक्रम खुणावतो आहे. यापूर्वी विवियन रिचर्ड्सने ऑस्ट्रेलियात सर्वाधिक ४२ अशा खेळी ऑस्ट्रेलियात खेळल्या आहेत. तर डेसमंड हेन्सनेही ३४ खेळी साकारल्या आहेत. तर विराट कोहलीच्या नावावर ऑस्ट्रेलियात ११ शतकं आणि १९ अर्धशतकं आहेत. आणखी ४ अर्धशतकं किंवा त्यापेक्षा जास्त धावा करून विराट आधी हेन्सला मागे टाकू शकतो. तसं झालं तर विराट कोहली ऑस्ट्रेलियातील सगळ्यात यशस्वी परदेशी फलंदाज ठरेल.

(हेही वाचा – स्वतःचा पक्ष काढणारे Sharad Pawar दुसऱ्यांना गद्दार म्हणत आहेत; संभाजीराजे छत्रपती यांचा टोला)

  • विराट कोहली (Virat Kohli) तीनही प्रकारच्या क्रिकेटमध्ये ऑस्ट्रेलियात प्रभावी ठरला आहे. त्याने आतापर्यंत ऑस्ट्रेलियन भूमीवर ३,४२६ धावा केल्या आहेत. या बाबतीत तो सचिन तेंडुलकरपेक्षा १२६ धावांनी पुढे आहे. आता विराटला ४,००० आंतरराष्ट्रीय धावांचा टप्पा ओलांडण्यासाठी ५७४ धावांची गरज आहे. तसं झालं तर ऑस्ट्रेलियन भूमीवर ४,००० आंतरराष्ट्रीय धावांचा टप्रा गाठणारा तो सगळ्यात यशस्वी फलंदाज ठरेल.
  • ॲडलेड ओव्हलवर विराटने आतापर्यंत ५ शतकं ठोकली आहेत आणि आणखी एका शतकासह तो या मैदानावर १,००० धावा पूर्ण करू शकतो. तसं झालं तर ॲडलेड ओव्हलवर १,००० धावा करणारा तो पहिला परदेशी क्रिकेटपटू ठरेल. आणि या शतकासह ऑस्ट्रेलियात एकाच मैदानावर सर्वाधिक शतकं ठोकण्याचा नवीन विक्रम तो करू शकेल. यापूर्वी इंग्लंडच्या जॅक हॉब्स यांनी मेलबर्न क्रिकेट मैदानावर ५ शतकं साजरी केली आहेत आणि परदेशी क्रिकेटपटूने एकाच मैदानावर सर्वाधिक शतकं करण्याचा विक्रम त्यांच्या नावावर जमा आहे.
  • तिसऱ्या गाबा कसोटीत विराट कोहली (Virat Kohli) ऑस्ट्रेलियाविरुद्धचा एक नवीन मापदंड सर करेल. ऑस्ट्रेलिया विरुद्ध तीनही प्रकारात आणि जगभरातील मैदानांवर त्याचा हा १०० वा सामना असेल. यापूर्वी सचिन तेंडुलकर ऑस्ट्रेलिया विरुद्ध ११० सामने खेळला आहे. विराट अशी कामगिरी करणारा फक्त दुसरा भारतीय फलंदाज असेल.
  • विराटने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये ऑस्ट्रेलिया विरुद्ध १६ आंतरराष्ट्रीय शतकं केली आहेत. आणखी ४ शतकांसह तो सचिन तेंडुवकरच्या २० आंतरराष्ट्रीय शतकांची बरोबरी तो करू शकतो.

(हेही वाचा – Baba Siddique Murder : पोलिसांनी मारेकऱ्यालाच विचारले ‘कोणाला पाहिलं काय?’)

आतापर्यंत या वर्षी विराट कोहलीची (Virat Kohli) बॅट शांतच राहिली आहे. मागच्या एका वर्षांत तीनही प्रकारच्या क्रिकेटमध्ये मिळून १९ सामन्यांत विराटने ४८८ धावा केल्या आहेत. त्याची सरासरीही २० धावांची राहिली आहे. अशावेळी ऑस्ट्रेलियातील मैदान त्याच्यासाठी नेहमीसारखं यशदायी ठरलं तर विराटसाठी ती चांगलीच गोष्ट ठरणार आहे. कारण, ३६ व्या वर्षी विराट कोहलीची कसोटी कारकीर्द आणखी किती लांबू शकेल याचा फैसला या मालिकेत होणार आहे.

हेही पहा –

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.