Narayan Rane यांचे उद्धव ठाकरेंना खुले आव्हान, म्हणाले…

149

राज्यात विधानसभा (Assembly Election 2024) निवडणुकीची जोरदार तयारी सुरू आहे. २८८ मतदारसंघासाठी येत्या २० नोव्हेंबर रोजी मतदान होणार आहे. तर २३ नोव्हेंबर रोजी निकाल जाहीर होणार आहे. दरम्यान, प्रचारसभांचा उत्साह शिगेला पोहोचला आहे. सभेत सत्ताधारी आणि विरोधक आरोप प्रत्यारोपांच्या फैऱ्या झाडत आहेत. अशातच भाजपाचे जेष्ठ नेते तथा खासदार नारायण राणे (Narayan Rane) यांनी शिवसेना उबाठा पक्षाचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांना ओपन चॅलेंज दिले आहे.  (Narayan Rane)

महायुतीचे उमेदवार निलेश राणेंच्या प्रचारार्थ मालवणमध्ये जाहीर मेळावा आयोजित करण्यात आला होता. या मेळाव्याला मंत्री उदय सामंत (Uday Samantha) यांच्यासह नारायण राणे व शिवसेनेचे पदाधिकारी उपस्थित होते. या मेळाव्यात नारायण राणे यांनी उद्धव ठाकरेंवर निशाणा साधला. नारायण राणे म्हणाले की, “केवळ बाळासाहेबांना दिलेल्या शब्दामुळे हा माणूस (उद्धव ठाकरे) वाचतो अशी टीका राणेंनी केली. आमच्या जिल्ह्यात येऊन आम्हालाच गाडायची भाषा केली जाते असं नारायण राणे म्हणाले. ‘एवढी हौस असेल तर एक दिवस संरक्षण काढून इथे या’ अशा पद्धतीत ओपेन चॅलेंज खासदार राणेंनी उद्धव ठाकरे यांना दिले”.

(हेही वाचा – BKC Underground Metro Station: मुंबई बीकेसीतील अंडरग्राऊंड मेट्रोला भीषण आग; मेट्रो-३ च्या फेऱ्या रद्द)

विधानसभेच्या मतदानासाठी अवघे पाच दिवस उरले आहेत, अशातच प्रचार सभांचा धुरळा उडाला आहे. शिवसेना उबाठा गटाचे उमेदवार वैभव नाईक (Vaibhav Naik) यांच्या प्रचारसभेत उद्धव ठाकरेंनी नारायण राणे आणि नितेश राणेंवर तोंडसुख घेत हिंदुत्त्व आणि मराठी माणसासाठी लढणाऱ्या ठाकरे कुटुंबाची घराणेशाही चालत नाही. मग कोकणावर गुंडगिरी करणाऱ्या राणे कुटुंबाची घराणेशाही कशी चालते? असा सवाल केला होता. त्यावर प्रतिउत्तर देत “केवळ बाळासाहेबांना दिलेल्या शब्दामुळे हा माणूस वाचतो अशी टीका राणेंनी केली.”

हेही पाहा –

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.