Mohammed Shami : मोहम्मद शमीचे पुनरागमनाच्या सामन्यात ४ बळी, ऑस्ट्रेलियाला जाणार का?

Mohammed Shami : त्याच्या गोलंदाजीत दुखापतीचा मागमूसही नव्हता. 

129
Ind vs Eng, 1st T20 : इंग्लंडविरुद्ध पहिल्या टी-२० त मोहम्मद शमी का खेळला नाही?
Ind vs Eng, 1st T20 : इंग्लंडविरुद्ध पहिल्या टी-२० त मोहम्मद शमी का खेळला नाही?
  • ऋजुता लुकतुके

भारताचा तेज गोलंदाज मोहम्मद शमीने (Mohammed Shami) रणजी करंडकातील मध्य प्रदेश विरुद्ध ४ बळी घेत क्रिकेटमध्ये दमदार पुनरागमन केलं आहे. जवळ जवळ एका वर्षाने स्पर्धात्मक क्रिकेट खेळणाऱ्या शमीच्या गोलंदाजीत दुखापतीचा मागमूसही दिसला नाही. इंदूरच्या पाटा खेळपट्टीवर शमीला हे यश मिळालं आहे हे विशेष. नोव्हेंबर २०२३ ला एकदिवसीय विश्वचषकात तो शेवटचं खेळला आहे. त्यानंतर त्याला घोट्याची दुखापत जडली आणि त्यावर शस्त्रक्रिया झाल्यावर सरावादरम्यान त्याचा गुडघा दुखावला आहे.

शमी (Mohammed Shami) दुखापतीतून परतल्यानंतर महत्त्वाचा प्रश्न आहे तो भारतीय संघात तो कधी खेळू शकेल आणि ऑस्ट्रेलिया दौऱ्यावर असलेल्या भारतीय संघात तो सहभागी होऊ शकेल का? सध्या शमीची तंदुरुस्ती आणि गोलंदाजीतील लय तपासून पाहिली जात आहे. बीसीसीआयचे फिजिओ नितीन पटेल त्याच्याबरोबर इंदूरमध्ये आहेत. तसंच उत्तर विभागाचे निवड समितीचे सदस्य अजय रात्राही हा सामना पाहण्यासाठी जातीने हजर होते.

(हेही वाचा – Narayan Rane यांची उद्धव ठाकरेंना ओपन चॅलेंज, म्हणाले… )

शमीच्या (Mohammed Shami) गोलंदाजीत कुठलंही अवघडलेपण नव्हतं. शमीला बीसीसीआयकडून मुद्दामच मध्य प्रदेश विरुद्धचा हा सामना खेळण्यासाठी सांगण्यात आलं होतं. कारण, रणजीचा दुसरा टप्पा इथून पुढे जानेवारीतच खेळवला जाणार आहे. तोपर्यंत आंतरराष्ट्रीय कसोटी हंगाम भारतासाठी संपलेला असेल. त्यामुळे त्याच्या तंदुरुस्तीचा अंदाज बीसीसीआयला घेता आला नसता.

आता मध्य प्रदेश विरुद्धचा सामना संपेपर्यंत शामी किती षटकं गोलंदाजी प्रत्येक्ष सामन्यात करू शकतो, क्षेत्ररक्षणात त्याचा जोर राहतो का याची परीक्षा होईल आणि त्यानंतर तंदुरुस्तीच्या चाचणीवरून तो ऑस्ट्रेलियाला जाऊ शकेल की नाही हे ठरेल. सुरुवातीला ऑस्ट्रेलिया दौऱ्यापूर्वी शामी (Mohammed Shami) तंदुरुस्त होईल या दृष्टीनेच प्रयत्न सुरू होते. पण, बंगळुरूमध्ये सराव करताना शमीच्या गुडघ्याला सूज येऊ लागली. त्यामुळे त्याचं रणजी पुनरागमनही लांबलं. आता मात्र ऑस्ट्रेलियात शमीला कधी पाठवता येईल यावर बीसीसीआयचाही विचार सुरू आहे.

हेही पहा –

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.