- ऋजुता लुकतुके
जागतिक क्रमवारीत अव्वल क्रमांकावर असलेला यानिक सिनर एटीपी मास्टर्स अंतिम स्पर्धेवरही वर्चस्व राखून आहे. मागच्या एका आठवड्यात त्याने आपले सर्व सामने, ते ही अगदी सेटही न गमावता जिंकले आहेत. त्याच्या घरच्या मैदानावर ही स्पर्धा होत असल्यामुळे त्याला प्रेक्षकांचाही पाठिंबा मिळत आहे. सलग विजयांमुळे स्पर्धेची उपांत्य फेरी गाठणारा तो पहिला खेळाडू ठरला आहे. (ATP World Finals 2024)
(हेही वाचा – BKC Underground Metro Station: मुंबई बीकेसीतील अंडरग्राऊंड मेट्रोला भीषण आग; मेट्रो-३ च्या फेऱ्या रद्द)
हंगामातील सर्वोत्तम ८ खेळाडूंमध्ये एटीपी अंतिम स्पर्धा होत असते आणि सध्या साखळी स्पर्धा सुरू असताना सिनर आणि टेलर फ्रिट्झ यांनी आपलं उपांत्य फेरीतील स्थान निश्चित केलं आहे. शेवटच्या साखळी सामन्यात सिनरने डॅनिएल मेदवेदेवचा ६-३, ६-४ असा पराभव केला. तर फ्रिट्झने ॲलेक्स दी मेनॉरचा ५-७, ६-४ आणि ६-३ असा पराभव केला. (ATP World Finals 2024)
(हेही वाचा – Narayan Rane यांचे उद्धव ठाकरेंना खुले आव्हान, म्हणाले…)
साखळी सामन्यातील विजयानंतर सिनरने या हंगामातील सलग विजयांची संख्या ९ वर नेली आहे. एका आठवड्यापूर्वीच तो यंदाचं वर्ष क्रमवारीतला अव्वल खेळाडू म्हणून पूर्ण करणार हे निश्चित झालं आहे. त्यातच अंतिम स्पर्धेतही तो दमदार कामगिरी करत आहे. त्याच्यासमोर इथं फ्रिट्झचंच मुख्य आव्हान असणार आहे. दोन महिन्यांपूर्वी सप्टेंबरमध्ये फ्रिट्झलाच हरवून सिनरने युएल ओपन विजेतेपद पटकावलं होतं. (ATP World Finals 2024)
Sinner can’t do any wrong 🙌@janniksin | #NittoATPFinals pic.twitter.com/H8MO0Wq8P2
— ATP Tour (@atptour) November 14, 2024
सिनर सध्या एका उत्तेजक द्रव्य प्रकरणातूनही जात आहे. गेल्यावर्षी एप्रिल महिन्यात सिनरच्या दोन उत्तेजक द्रव्य चाचण्या सदोष आढळल्या होत्या. त्यावर नकळतपणे एका वेदनाशामक औषधातून ते द्रव्य अजाणतेपणे पोटात गेल्याची बाजू यानिक सिनरने मांडली आहे. ती सध्या ग्राह्य धरत जागतिक उत्तेजक द्रव्य विरोधी संस्थेनं यानिक सिनरला खेळण्याची परवानगी दिली आहे. पण, या प्रकरणी सुनावणीही सध्या सुरू आहे. आणि २०२५ मध्येच निकाल अपेक्षित आहे. (ATP World Finals 2024)
हेही पहा –
Join Our WhatsApp Community