Tata Motors आणि मॅजेंटा मोबिलिटी यासंदर्भात अग्रस्‍थानी

30
Tata Motors आणि मॅजेंटा मोबिलिटी यासंदर्भात अग्रस्‍थानी

भारतातील लास्‍ट-माइल लॉजिस्टिक्‍स क्षेत्रात कार्यक्षम, किफायतशीर आणि शाश्‍वत सोल्‍यूशन्‍ससाठी वाढत्‍या मागणीमुळे झपाट्याने परिवर्तन होत आहे. या परिवर्तनाच्‍या अग्रस्‍थानी असलेली एकीकृत इलेक्ट्रिक गतीशीलता सोल्‍यूशन्‍स प्रदाता मॅजेंटा मोबिलिटी भारतातील सर्वात प्रगत, शून्‍य-उत्‍सर्जन, चारचाकी स्‍मॉल कमर्शियल वेईकल टाटा मोटर्सची (Tata Motors) एस ईव्‍हीच्‍या उच्‍च उत्‍पन्‍न क्षमता आणि कमी टोटल कॉस्ट ऑफ ओनरशीप (टीसीओ)चा फायदा घेत लॉजिस्टिक्‍स क्षेत्रातील प्रमुख कंपनी ठरली आहे. आपल्‍या ताफ्यामध्‍ये एस ईव्‍हीची भर करत मॅजेंटा मोबिलिटी लास्‍ट-माइल डिलिव्‍हरीचा दर्जा नव्‍या उंचीवर घेऊन जात आहे, कार्यरत कार्यक्षमता आणि शाश्‍वततेमध्‍ये अद्वितीय यश प्राप्‍त करत आहे.

(हेही वाचा – Rahul Gandhi यांनी ‘ते’ पुस्तक दाखवून संविधानाची केली कुचेष्टा   )

टाटा एस ईव्‍हीने मॅजेंटा मोबिलिटीला कमी कार्बन फूटप्रिंटसह कार्यसंचालनांची अंमलबजावणी करण्‍यास, तसेच उच्‍च कार्यक्षमता आणि विश्‍वसनीयता राखण्‍यास सक्षम केले आहे. एस ईव्‍ही लास्‍ट-माइल लॉजिस्टिक्‍स क्षेत्राच्‍या मागण्‍यांची पूर्तता करण्‍यासाठी उपयुक्‍त आहे, ज्‍यामधून विविध मार्गांवर सातत्यपूर्ण, किफायतशीर आणि वेळेवर डिलिव्‍हरींची खात्री मिळते. मॅजेंटा मोबिलिटीचे संस्‍थापक व मुख्‍य कार्यकारी अधिकारी मॅक्‍सन लुईस म्‍हणाले, ”इलेक्ट्रिक कार्गो फ्लीट ऑपरेटर म्‍हणून आम्‍ही बाजारपेठेत धुमाकूळ निर्माण करण्‍यासाठी योग्‍य वेईकलची वाट पाहत होतो. एस ईव्‍ही गरजांची पूर्तता करते, तसेच मोठी पेलोड क्षमता आणि लांबची रेंज देते, जे चार-चाकी इलेक्ट्रिक विभागात गरजेचे आहे. एस ईव्‍हीने आमच्‍या कार्यसंचालनांमध्‍ये मोठ्या प्रमाणात वाढ केली आहे, आम्‍हाला शाश्‍वत सोल्‍यूशन्स व अद्वितीय कार्यक्षमता, उच्‍च अपटाइम व लाभक्षमता देत आहे. एस ईव्‍हीची उच्‍च दर्जाची रेंज व पेलोड क्षमतेसह आम्‍ही लॉजिस्टिक्‍सचे डिकार्बनायझेशन करण्‍यासोबत आमच्‍या व्‍यवसायाला ऑप्टिमाइज करण्‍यामध्‍ये यशस्‍वी ठरलो आहेत. टाटा मोटर्सचा (Tata Motors) हा सहयोग आम्‍हाला निव्‍वळ-शून्‍य कार्बन भविष्‍य संपादित करण्‍याच्‍या व्‍यापक मिशनशी आमच्‍या व्‍यवसास ध्‍येयांना संलग्‍न करण्‍याची सुविधा देतो.”

(हेही वाचा – Virat Kohli : बोर्डर-गावस्कर चषकात ‘हे’ विक्रम विराट कोहली मोडू शकेल)

ग्राहकांसोबतच्‍या सहयोगाने विकसित करण्‍यात आलेली टाटा एस ईव्‍ही आधुनिक व्‍यवसाय मागण्‍यांची पूर्तता करणारे नाविन्‍यपूर्ण, शून्‍य-उत्‍जर्सन सोल्‍यूशन्‍स देण्‍याप्रती टाटा मोटर्सची कटिबद्धता दर्शवते. देशभरातील २०० हून अधिक समर्पित इलेक्ट्रिक वेईकल सर्विस सेंटर्सचे पाठबळ असलेल्‍या एस ईव्‍हीमध्‍ये प्रगत बॅटरी मॅनजमेंट सिस्‍टम आणि ‘फ्लीट एज’ टेलिमॅटिक्‍स आहे, तसेच वेईकल अपटाइम व रस्‍त्‍यावरील सुरक्षिततेमध्‍ये सुधारणा करण्‍यासाठी स्‍मार्ट तंत्रज्ञानांचा वापर करण्‍यात आला आहे आणि वेईकल स्‍टेटस, हेल्‍थ, लोकेशन व ड्रायव्‍हरची ड्राइव्‍ह करण्‍याची पद्धत अशी रिअल-टाइम माहिती मिळते. एस ईव्‍हींनी जवळपास ९९ टक्‍के अपटाइमसह एकूण ५ कोटी किमीहून अधिक अंतर पार केले आहे, ज्‍यामधून वास्‍तविक विश्‍वात कार्यसंचालनांमधील त्‍यांची विश्‍वसनीयता व कार्यक्षमता दिसून येते. एस ईव्‍ही ६०० किग्रॅ आणि १००० किग्रॅ पेलोड पर्यायांमध्‍ये उपलब्‍ध आहे, जे विविध ग्राहक गरजा आणि उपयोजनांसाठी डिझाइन करण्‍यात आले आहेत. एस ईव्‍हीला मोठे यश आणि ग्राहकांकडून प्रशंसा मिळाली आहे आणि भारतातील सर्वात लोकप्रिय इलेक्ट्रिक एससीव्‍ही म्‍हणून कायम आहे. (Tata Motors)

हेही पहा –

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.