Drugs : गुजरात एटीएस व एनसीबीची पोरबंदरमध्ये संयुक्त कारवाई; 500 किलो ड्रग्जसह 8 जणांना अटक

33
Drugs : गुजरात एटीएस व एनसीबीची पोरबंदरमध्ये संयुक्त कारवाई; 500 किलो ड्रग्जसह 8 जणांना अटक

गुजरातच्या पोरबंदर येथे दहशतवाद विरोधी पथक (एटीएस) आणि अमली पदार्थ विरोधी पथक (एनसीबी) यांच्या संयुक्त कारवाईत तब्बल 500 किलो अमली पदार्थ (Drugs) जप्त करण्यात आले. समुद्राच्या मध्यभागी करण्यात आलेल्या या कारवाईत 8 विदेशी नागरिकांना अटक करण्यात आली आहे.

(हेही वाचा – Delhi Air Pollution : दिल्लीतील प्रदूषणाने गाठली धोक्याची पातळी)

यासंदर्भातील माहितीनुसार जप्त करण्यात आलेले हे ड्रग्ज (Drugs) इराणी बोटीतून आणले जात होते आणि आयएमबीएलच्या रडारवर आल्यानंतर अमली पदार्थ हस्तगत करण्यात यश आले. एनसीबी, नेव्ही आणि गुजरात पोलिसांच्या एटीएसने केलेल्या संयुक्त कारवाईत सुमारे 500 किलो मेथची मोठी खेप भारतीय जलक्षेत्रात पकडण्यात आली.

(हेही वाचा – Virat Kohli : बोर्डर-गावस्कर चषकात ‘हे’ विक्रम विराट कोहली मोडू शकेल)

या कारवाईदरम्यान 8 परदेशी नागरिकांना अटक करण्यात आली असून, ते इराणी असल्याचा दावा करतात. यापूर्वी मार्च महिन्यामध्ये गुजरात एटीएसच्या पथकाने 6 पाकिस्तानी नागरिकांना अटक केली होती. त्यांच्याकडून मोठ्या प्रमाणात अमली पदार्थांचा (Drugs) साठा पथकाने जप्त केला होता.

हेही पहा –

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.