- ऋजुता लुकतुके
रिलायन्स वायकॉम १८ आणि डिस्नी हॉटस्टार या दोन्ही मीडिया कंपन्यांनी ठरल्याप्रमाणे आपली विलीनीकरणाची प्रक्रिया पूर्ण झाल्याचं जाहीर केलं आहे. या विलीनीकरणाला आवश्यक त्या मान्यताही मिळाल्याचं नवीन कंपनीने जाहीर केलं आहे. रिलायन्स समुहाने या नवीन कंपनीत ११,५०० कोटी रुपयांची गुंतवणूक केली आहे. स्थापन झालेल्या नवीन कंपनीत वायकॉम १८ ची भागिदारी ४६.८२%, रिलायन्सची १६.३४% आणि डिस्नी हॉटस्टारची भागिदारी ३६.८४% टक्के आहे. (Reliance-Disney Merger)
(हेही वाचा – बांगलादेशात ISKCON वर बंदी घातली नाही, तर हत्याकांड सुरूच राहणार; मौलवीचा युनूस सरकारला इशारा)
क्रीडाविषयक कार्यक्रम, मनोरंजक कार्यक्रम आणि सोशल मीडिया कार्यक्रम असे तीन वेगवेगळे विभाग करण्यात आले आहेत. या तीनही कार्यक्रमांची जबाबदारी तीन सीईओंवर सोपवण्यात आली आहे. केविन वाझ यांच्यावर मनोरंजन विभागाची जबाबदारी सोपवण्यात आली आहे. तर किरण मणी यांच्यावर डिजिटल माध्यमाची तसंच संजोग गुप्ता यांच्यावर क्रीडा विषयक कार्यक्रमांची जबाबदारी सोपवण्यात आली आहे. नवीन संस्थेच्या अध्यक्ष असतील नीता अंबानी तर उपाध्यक्ष असतील विजय शंकर. (Reliance-Disney Merger)
(हेही वाचा – Mohammed Shami : मोहम्मद शमीचे पुनरागमनाच्या सामन्यात ४ बळी, ऑस्ट्रेलियाला जाणार का?)
दुसरीकडे, रिलायन्स समुहाने वायकॉम १८ मधील आणखी १३ टक्के हिस्सेदारी विकत घेतली आहे. त्यामुळे वायकॉममधील ७० टक्के हिस्सेदारी आता रिलायन्स समुहाकडे आली आहे. स्टार आणि कलर्स यांचा वाहिनी समुह तसंच जिओ सिनेमा आणि हॉटस्टार या डिजिटल माध्यमातील वाहिन्या यांचं आता एकत्रीकरण करण्यात येईल. हा विलीनीकरण प्रक्रियेचा पुढील टप्पा असणार आहे. त्यामुळे डिस्ने हॉटस्टार आणि जिओ सिनेमा जाऊन त्याजागी जिओ स्टार नावाने नवीन ओटीटी वाहिनी लाँच केली जाईल. समुहाकडे आता १०० च्या वर वाहिन्या आणि १०,००० तासांच्या वर मनोरंजनात्मक कार्यक्रम तयार आहेत. कलर्स तसंच स्टार या वाहिन्यांची नावंही आगामी काळात बदलण्यात येतील. (Reliance-Disney Merger)
हेही पहा –
Join Our WhatsApp Community