Assembly Election 2024 : हिंगोलीच्या सभेत Amit Shah यांचा दावा; म्हणाले, उद्धव ठाकरे हे पाखंडी…

102

केंद्रीय गृहमंत्री अमित शाह (Amit Shah) महाराष्ट्राच्या दौऱ्यावर आहेत. दरम्यान, विधानसभा निवडणुकीसाठी मोजून ५ दिवस शिल्लक राहिले आहेत. येत्या २० नोव्हेंबर रोजी मतदान होणार असून, २३ नोव्हेंबर रोजी निकाल जाहीर होणार आहे. दरम्यान या सभेत अमित शाहांनी उद्धव ठाकरेंवर (Uddhav Thackeray) गंभीर दावा केला आहे.  (Assembly Election 2024)

हिंगोलीच्या सभेत अमित शाह म्हणाले की, उबाठा गटाचे पदाधिकारी, कार्यकर्ते औरंगजेब फॅनक्लबच्या कडेवर बसले आहेत. हिंदुत्वाला पाखंड म्हणणाऱ्यांची साथ देत आहेत. अफजलखान, औरंगजेबाची कबर सुशोभीत करणाऱ्यांना साथ देणाऱ्या उध्दव ठाकरे यांनी हिंदूहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे (Balasaheb Thackeray) यांनी कोणता मार्ग दाखविला हे लक्षात घेतले पाहिजे. माजी मुख्यमंत्री तथा शिवसेना उबाठा गटाचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी काँग्रेस नेते राहुल गांधी (Rahul Gandhi) यांच्याकडून स्वातंत्र्यवीर सावरकर, शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्याबद्दल चांगले बोलून घेऊन दाखवावे, असे आव्हानही शाह यांनी यावेळी दिले. (Assembly Election 2024)

(हेही वाचा – Narayan Rane यांचे उद्धव ठाकरेंना खुले आव्हान, म्हणाले…)

राज्यातील मुख्यमंत्री शिंदे (CM Eknath Shinde), उपमुख्यमंत्री फडणवीस सरकार गरजू जनतेला समर्पित असून जनतेला घरे, स्वच्छतागृह, पिण्याचे पाणी, धान्य, मोफत गॅस सिलेंडर व आता पाच लाख रुपयांपर्यंतचा मोफत औषधोपचाराची व्यवस्था केल्याचेही शाह यांनी यावेळी सांगितले. महायुतीचे सहकार दिव्यांग, वृध्द व विधवांना दरमहा १५०० रुपये सेवानिवृत्ती वेतन देणार असल्याचे आश्‍वासन त्यांनी दिले. राज्यातील विधानसभा निवडणुक जनतेसाठी महत्वाची असून राज्य छत्रपती शिवाजी महाराज यांच्या विचारांनी दिलेल्या मार्गाने न्यायचे की औरंगजेबाच्या मार्गाने न्यायये हे जनतेने ठरविण्याची वेळ असल्याचे अमित शाह यांनी स्पष्ट केले.

हेही पाहा –

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.