विधानसभा निवडणुकीच्या पाश्वभूमीवर भाजपाने (BJP) ‘माझा बुथ, सर्वात मजबूत’ या अभियानाची घोषणा केली आहे. या अभियानाअंतर्गत पंतप्रधान नरेंद्र मोदी महाराष्ट्रातील १ लाख बुथ प्रमुखांशी संवाद साधणार आहेत. हा संवाद नमो अॅपच्या माध्यमातून व ऑनलाईन पद्धतीने साधला जाणार आहे. दि. १६ नोव्हेंबर रोजी सकाळी साडेअकरा वाजाता या अभियानाचे आयोजन करण्यात आले आहे. (BJP)
(हेही वाचा : ATP World Finals 2024 : एटीपी अंतिम फेरीत यानिक सिनर, टेलर फ्रिट्झ यांनी गाठली उपांत्य फेरी)
भाजपाने आपल्या कार्यकर्त्यांना प्रेरणा देण्यासाठी आणि त्यांच्यात नवचैतन्य निर्माण करण्यासाठी हा उपक्रम सुरु करण्यात येणार आहे. या संवादाद्वारे पंतप्रधान मोदी भाजपच्या (BJP) निवडणूक रणनितीला बळकटी मिळवून देतील. त्यामुळे प्रत्येक बुथ लेव्हलवर भाजपाची पकड अधिक मजबूत होईल. (BJP)
पंतप्रधान नरेंद्र मोदींचा हा कार्यक्रम भाजपच्या (BJP) निवडणूक तयारीतील एक महत्त्वाचा टप्पा मानला जातो. निवडणुकीत बुथ प्रमुख हा निवडणुकीच्या व्यवस्थापनात महत्त्वाचा घटक असतो. त्यामुळे पंतप्रधानांचा हा संवाद महत्त्वाचा ठरणार आहे. (BJP)
हेही पाहा :