Sanjay Raut यांनी जळगाव ग्रामीणचे तिकीट विकले; गुलाबराव पाटील यांची टीका

31
Sanjay Raut यांनी जळगाव ग्रामीणचे तिकीट विकले; गुलाबराव पाटील यांची टीका
  • खास प्रतिनिधी 

जळगाव ग्रामीण मतदारसंघाचे महायुतीचे उमेदवार गुलाबराव पाटील यांनी गुरुवारी १४ नोव्हेंबर २०२४ या दिवशी मतदारसंघात नशिराबाद येथे एका सभेला संबोधित करताना शिवसेना उबाठा प्रवक्ते, खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांच्यावर कडाडून टीका केली. संजय राऊत यांनी जळगाव ग्रामीण मतदारसंघाचे तिकीट गुलाबराव देवकर यांना विकले, असा थेट आरोप पाटील यांनी भर सभेत केला.

(हेही वाचा – ATP World Finals 2024 : एटीपी अंतिम फेरीत यानिक सिनर, टेलर फ्रिट्झ यांनी गाठली उपांत्य फेरी)

राऊत मला टरकतात

पाटील म्हणाले, “संजय राऊत (Sanjay Raut) साधा नगरसेवक होऊ शकत नाही. मागच्या दाराने, या बापाने (स्वतःला उद्देशून) वडापाव खाऊन त्यांना मते दिली म्हणून तीन वेळा राज्यसभेवर खासदार झाले आणि ते पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर टीका करतात?” असा प्रश्न करत, “तुम्हाला (शिवसेना उबाठा) कोणी माणूस भेटला नाही म्हणून देवकर यांना आणले. ज्या देवकर यांनी आयुष्यभर शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्यावर टीका केली, आज त्यांचा फोटो लावून देवकर मते मागत आहेत. राऊत मला टरकतात. राऊत यांचे सगळे धंदे आम्हाला माहीत आहे. राऊत तिकीट विकतात, ही जागा त्यांनी विकली,” असे पाटील म्हणाले.

(हेही वाचा – Drugs : गुजरात एटीएस व एनसीबीची पोरबंदरमध्ये संयुक्त कारवाई; 500 किलो ड्रग्जसह 8 जणांना अटक)

जायचं असेल तर तुम्ही जाऊ शकता

पाटील यांनी एकनाथ शिंदे यांच्या बंडाच्यावेळी घडलेली एक गोष्ट सांगितली. ते म्हणाले, “संजय राऊत म्हणतात मी गांडू आहे. गुलाबराव पळाले. पण मी आता सांगतो मी ३३ वा होतो. त्यावेळी मी २० आमदारांना घेऊन उद्धव ठाकरे यांना भेटायला गेलो. मी त्यांना म्हणालो की, भाजपासोबत आपली नैसर्गिक युती आहे, एकनाथजींना आपण परत बोलावू शकतो. जबाबदारी आमच्यावर द्या. आम्ही एकनाथराव शिंदे यांना वापीहून परत घेऊन येतो. माझ्यासोबत तेव्हा उदय सामंत, दादाजी भुसे, दीपक केसरकर, संजय राठोड असे अनेकजण होते. तेव्हा संजय राऊत म्हणाले, साला दीखता है शेर जैसा और दिल चुहे जैसा. जायचं असेल तर तुम्ही जाऊ शकता,” असा किस्सा गुलाबराव पाटील यांनी सभेत सांगितला.

हेही पहा –

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.