- विशेष प्रतिनिधी, मुंबई
भाजपाचे राष्ट्रीय सरचिटणीस आणि महाराष्ट्रातील भाजपा नेते विनोद तावडे यांनी राज्यात महायुतीचे सरकार येणार असून त्यामध्ये विद्यमान मुख्यमंत्री कायम राहतील किंवा नवीन मुख्यमंत्री येईल अशाप्रकारचे वक्तव्य वृत्तवाहिनीला दिलेल्या विशेष मुलाखतीत केले आहे. त्यामुळे नवा मुख्यमंत्री कोण असेल अशा प्रकारच्या चर्चेला सुरुवात झाली असून हा फ्रेश चेहरा म्हणून महायुतीतील तिसऱ्या घटक पक्षाचे प्रमुख अजित पवार हे असतील असे बोलले जात आहे. सरकार अगदी काठावर येणार असल्याने अजित पवारांना मुख्यमंत्री बनवून शरद पवारांना कोणतेही शहकाटशहाचे राजकारण करता येणार नाही यासाठी अजित पवारांना मुख्यमंत्री बनवण्याचा प्रयत्न होईल असे बोलले जात आहे. (Maharashtra Assembly Election)
(हेही वाचा – गंगा नदीत सुहासिनींचे कुंकू पुसत पाद्रीकडून Hindu महिलांचे सामूहिक धर्मांतर)
विनोद तावडे यांनी मराठी वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीमध्ये भाजपाच्या सर्वेनुसार विधानसभा निवडणुकीत महाराष्ट्रात भाजपा ९५ ते ११० जागा जिंकेल. शिवसेनेला ४० ते ५० जागांवर विजय मिळेल तसेच अजित पवार यांच्या राष्ट्रवादी पक्षाला २५ ते ३० जागा मिळतील. या निवडणुकीत बहुमत आम्हाला मिळेल. महायुतीला १६५ पर्यंत जागा मिळतील अशाप्रकारचा दावा विनोद तावडे यांनी केला आहे. त्यामुळे महायुतीचे सरकार आल्यास मुख्यमंत्री पदासाठी पक्ष नवीन चेहरा देऊ शकतो असे सांगितले. त्यानंतर पत्रकार परिषदेत विनोद तावडे यांनी निवडणूक निकालानंतर मुख्यमंत्री पदाचा चेहरा ठरवला जाईल असे सांगितले. (Maharashtra Assembly Election)
(हेही वाचा – Assembly Election 2024 : हिंगोलीच्या सभेत Amit Shah यांचा दावा; म्हणाले, उद्धव ठाकरे हे पाखंडी…)
त्यातच देवेंद्र फडणवीस आपण कोणत्याही शर्यतीत नसून मुख्यमत्रीपदासाठी मी काही इच्छुक नाही असे स्पष्ट केले. विशेष म्हणजे एकनाथ शिंदे हे ४० आमदारांसह भाजपासोबत आल्यानंतर त्यांना मुख्यमंत्री केले. परंतु त्यांच्यानंतर अजित पवार हेही ४० आमदारांसह भाजपासोबत आले आणि त्यांना उपमुख्यमंत्री बनवले. त्यामुळे आगामी विधानसभेत महायुतीला यश मिळणार असल्याने हा नवीन चेहरा तथा फ्रेश चेहरा म्हणजे अजित पवार हेच असल्याचे बोलले जात आहे. महायुतीचे सरकार हे काटावर येणार असल्याने कोणत्याही प्रकारचा दगाफटका शरद पवार यांच्याकडून होऊ शकतो. त्यामुळे अजित पवार यांना मुख्यमंत्री बनवल्यास हा दगाफटका होण्याची शक्यता कमी आहे. त्यामुळे अजित पवारांच्या जागा कमी आल्या तरी सरकार स्थापन करण्याची संधी हातची जाऊ नये याकरता हा पर्याय असू शकतो असे बोलले जात आहे. (Maharashtra Assembly Election)
हेही पहा –
Join Our WhatsApp Community