Uttar Pradesh: झाशी मेडिकल कॉलेजमध्ये बालकांच्या वॉर्डमध्ये अग्नीतांडव, 8 नवजात बाळांचा मृत्यू

33
Uttar Pradesh: झाशी मेडिकल कॉलेजमध्ये बालकांच्या वॉर्डमध्ये अग्नीतांडव, 8 नवजात बाळांचा मृत्यू
Uttar Pradesh: झाशी मेडिकल कॉलेजमध्ये बालकांच्या वॉर्डमध्ये अग्नीतांडव, 8 नवजात बाळांचा मृत्यू

महाराणी लक्ष्मीबाई वैद्यकीय महाविद्यालयात (Uttar Pradesh) शुक्रवारी (१५ नोव्हें.) रात्री अचानक आग लागली. या आगीमुळे नवजात बालकांच्या वॉर्डात असलेल्या ८ बालकांचा मृत्यू झाला आहे. आग लागल्यानतर हॉस्पिटलमध्ये चेंगराचेंगरी देखील झाली. दुर्घटनेची माहिती मिळाल्यानंतर अग्निशमन दल तातडीने घटनास्थळी दाखल झाले. खिडक्या फोडून रुग्ण आणि त्यांच्या नातेवाईकांना बाहेर काढण्यात आले. (Uttar Pradesh)

शॉर्टसर्किटमुळे आग लागल्याची प्राथमिक माहिती
वैद्यकीय महाविद्यालयातील (Jhansi medical college) निक्कू (न्यू बॉर्न इंटेन्सिव्ह केअर युनिट) वॉर्डमध्ये १२ मुलांना अतिदक्षता विभागात ठेवण्यात आले आहे. रात्री 11.40 वाजण्याच्या सुमारास वॉर्डात शॉर्टसर्किटमुळे आग लागल्याची प्राथमिक माहिती आहे. आगीच्या ज्वाळा दूरवर दिसत होत्या आणि मुख्य दरवाजा धुराच्या लोटाने व्यापला होता, त्यामुळे आत जाणं शक्य होत नव्हतं. अग्निशमन दलाच्या जवानांनी वॉर्डच्या खिडकीच्या काचा फोडून आत पोहोचून भाजलेल्या 8 मुलांना बाहेर काढले. (Uttar Pradesh)

मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्या बचाव कार्याला गती देण्याच्या सूचना
आतापर्यंत 50-60 मुलांना बाहेर काढण्यात आले आहे. या घटनेवर शोक व्यक्त करत मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी बचाव कार्याला गती देण्याच्या सूचना दिल्या आहेत. भाजप आमदार राजीव सिंह पारीछा म्हणाले की, ही अतिशय दुःखद आणि दुर्दैवी घटना आहे. जवळपास 35 बाळांना वाचवण्यात आले. जखमी नवजात बाळांवर डॉक्टर सर्वोत्तम उपचार करत आहेत. सरकार मेडिकल कॉलेजच्या डॉक्टरांच्याही संपर्कात आहेत. प्राथमिकदृष्ट्या शॉर्ट सर्किटमुळे आग लागल्याचे म्हटले जात आहे. (Uttar Pradesh)

तपास करण्यासाठी समिती स्थापित
जिल्हाधिकाऱ्यांनी प्रसिद्धी माध्यमांशी बातचित करताना म्हटले की, मेडिकल कॉलेजमध्ये उपस्थित असलेल्या अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार रात्री 10.30 ते 10.45 वाजेदरम्यान नवजात अतिदक्षता विभागामध्ये (NICU) शॉर्ट सर्किटमुळे आग लागली. बाहेरील भागामध्ये असणाऱ्या जवळपास सर्वच लहान मुलांना वाचवण्यात आले. पण आतमध्ये असणाऱ्या 10 नवजात बाळांचा मृत्यू झाल्याची माहिती समोर आली. घटनेचा तपास करण्यासाठी मंडळ आयुक्त आणि पोलीस उपमहानिरीक्षकांच्या नेतृत्वामध्ये समिती स्थापित करण्यात आली आहे. (Uttar Pradesh)

हेही पहा-

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.