Devendra Fadanvis यांचा मविआवर हल्लाबोल; मतांसाठी नेते उलेमाचे तळवे चाटत आहेत

39
Devendra Fadanvis यांचा मविआवर हल्लाबोल; मतांसाठी नेते उलेमाचे तळवे चाटत आहेत
Devendra Fadanvis यांचा मविआवर हल्लाबोल; मतांसाठी नेते उलेमाचे तळवे चाटत आहेत

ऑल इंडिया पर्सनल लॉ बोर्डाचे प्रवक्ते सज्जाद नोमानी यांच्या व्हिडिओवरून भाजपा आक्रमक झाली आहे. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी खडकवासला येथील प्रचारसभेत नोमानी यांचा व्हिडिओ ऐकवत महाविकास आघाडीच्या नेत्यांवर जोरदार टीका केली. देशाला अस्थिर करण्याचे काम सुरू असून महाविकास आघाडी त्यांच्यासोबत सामील झाल्याचा आरोप देवेंद्र फडणवीसांनी केला. आता एक राहिलो तरच सेफ राहू असे म्हणत देवेंद्र फडणवीसांनी सभेमध्ये एक है तो सेफ है…चा नारा दिला. (Devendra Fadanvis)

(हेही वाचा- Assembly Election 2024 : मुंबईकरांनो, ‘मतदान करा, सवलत मिळवा; जाणून घ्या काय आहेत सवलती)

देवेंद्र फडणवीस म्हणाले, आज ज्या प्रकारचे लांगुलचालन काँग्रस, शरद पवार एनसीपी आणि उबाठाच्या वतीने सुरू आहे. आम्ही कोणत्या धर्माच्या विरोधात नाही. आम्ही लाडकी बहीण योजना सगळ्या धर्माच्या बहिणींना दिली. काही पक्ष व्होटांच्या नावावर ध्रुवीकरण करत असतील तर मी तुम्हाला जागे करायला आलो आहे. उलेमा कौन्सिलने मविला 17 मागण्या दिल्यात. त्यातील काही मागण्या खतरनाक आहे. मुस्लिमांना 10 टक्के आरक्षण, 2012 ते 2024 या कालावधीत महाराष्ट्रात झालेल्या दंगलींमध्ये पकडलेल्या मुस्लिमांवरील सगळ्या केसेस मागे घ्या, अशा या मागण्या आहेत. महाविकास आघाडीने मतांसाठी या सगळ्या मागण्या मान्य करण्याबाबत लेखी दिले आहे. मविआकडून मतांसाठी पाय चाटणे सुरू केले आहे. आता त्यांनी व्होट जिहादचा नारा दिला आहे, असे फडणवीस म्हणाले. (Devendra Fadanvis)

व्होट जिहादसाठी हे उलेमानचे तळवे चाटत आहेत

यानंतर देवेंद्र फडणवीसांनी सज्जाद नोमानी यांची व्हिडिओ क्लिप भाषणात ऐकवली. त्यानंतर बोलताना फडणवीस म्हणाले, आता व्होट जिहादचा नारा दिला आहे. व्होट जिहादचे सिपेसिलार कोण आहेत, हे तुम्ही ऐकले आहे. व्होट जिहादसाठी हे उलेमानचे तळवे चाटत आहेत. दंगेखोरांना आम्ही सोडून देऊ, असे ते सांगत आहेत. जर या ठिकाणी व्होट जिहाद होणार असेल तर आता मतांचे धर्मयुद्ध आपल्याला देखील लढावे लागेल, असे आवाहन फडणवीस यांनी केले. (Devendra Fadanvis)

हेही पहा- 

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.