तुम्ही लोकलने (Mumbai Local Train) प्रवास करणार असाल तर ही बातमी तुमच्यासाठी अत्यंत महत्त्वाची आहे. कारण, शनिवार – रविवारी 12 तासांचा मेगाब्लॉक घेण्यात येणार आहे. त्यामुळे लोकलने प्रवास करण्यापूर्वी वेळापत्रक पाहुनच घरातून बाहेर पडा. रेल्वेकडून रुळांची देखभाल-दुरुस्ती तसेच अभियांत्रिकी कामांमुळे मेगाब्लॉक घेण्यात येणार आहे. आता शनिवारी (16 नोव्हेंबर) ते रविवार (17 नोव्हेंबर) या दोन दिवशी रेल्वेच्या पश्चिम आणि हार्बर या मार्गांवर मेगाब्लॉक घेण्यात येणार आहे. (Mumbai Local Train)
असा असेल ब्लॉक
जोगेश्वरी आणि गोरेगाव या रेल्वे स्थानकांच्या दरम्यान पुलाचा गर्डर बसवण्यासाठी धीमी अप-डाऊन आणि हार्बर अप-डाऊन रेल्वे मार्गावर पश्चिम रेल्वेने 12 तासांचा ब्लॉक जाहीर केला आहे. शनिवारी रात्री 11.30 वाजल्यापासून ते रविवारी सकाळी 11.30 वाजेपर्यंत हे काम सुरू राहणार आहे. या ब्लॉक दरम्यान काही लोकल फेऱ्या रद्द करण्यात आल्या असून काही लोकल विलंबाने धावणार आहेत. (Mumbai Local Train)
पश्चिम रेल्वे आणि हार्बर रेल्वेच्या जोगेश्वरी आणि गोरेगाव रेल्वे स्थानकाच्या दरम्यान धीम्या अप-डाऊन तर हार्बर मार्गावर ब्लॉक घेण्यात येणार आहे. हा ब्लॉक शनिवारी रात्री 11.30 ते रविवारी सकाळी 11.30 वाजेपर्यंत असणार आहे. (Mumbai Local Train)
ब्लॉकमुळे काय परिणाम? (Mumbai Local Train)
अंधेरी आणि गोरेगाव / बोरिवलीवरील अप-डाऊन धीम्या मार्गावरील अप – डाऊन धीम्या मार्गावरील लोकल अप – डाऊन जलद मार्गावर वळवण्यात येणार आहेत.
राम मंदिर स्थानकात जलद मार्गावरील फलाट नसल्याने कोणतीही लोकल उपलब्ध होणार नाही
मध्य रेल्वेवरील लोकल फेऱ्या अंधेरी स्थानकापर्यंतच धावतील आणि तेथूनच परतीचा प्रवास सुरू करतील.
सर्व मेल-एक्सप्रेस 20 मिनिटांहून अधिक वेळ विलंबाने धावणार आहेत.
अनेक लोकल रद्द राहणार असून अनेक विलंबाने धावणार आहेत.
हेही पहा-
Join Our WhatsApp Community