Ind vs SA, 4th T20 : दक्षिण आफ्रिकेचा १३५ धावांनी दणदणीत पराभव करत भारतीय संघाने जिंकली ३-१ ने मालिका

Ind vs SA, 4th T20 : तिलक वर्मा आणि संजू सॅमसन यांनी या सामन्यात नाबाद ११० धावांची भागिदारी केली. 

60
Ind vs SA, 4th T20 : दक्षिण आफ्रिकेचा १३५ धावांनी दणदणीत पराभव करत भारतीय संघाने जिंकली ३-१ ने मालिका
Ind vs SA, 4th T20 : दक्षिण आफ्रिकेचा १३५ धावांनी दणदणीत पराभव करत भारतीय संघाने जिंकली ३-१ ने मालिका
  • ऋजुता लुकतुके

भारतीय संघ – २० षटकांत १ बाद २८३

वि. द आफ्रिकन संघ – १८.२ षटकांत सर्वबाद १४८

या धावफलकातच भारत विरुद्ध दक्षिण आफ्रिका चौथ्या टी-२० चं सगळं सार दडलेलं आहे. भारताकडून विक्रमांची मोडतोड करणारी फलंदाजी आणि गोलंदाजी झाली. तर आफ्रिकन संघाला १९ षटकांत दीडशेचा पल्लाही गाठता आला नाही. इतकं वर्चस्व राखून भारतीय संघाने १३५ धावांनी या सामन्यात विजय मिळवला. (Ind vs SA, 4th T20)

नाणेफेकीपासून सगळं भारतीय संघाच्या मनासारखं घडत गेलं. सूर्यकुमार यादवने पहिली फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. संजू सॅमसन आणि अभिषेक शर्माने सहाव्या षटकातच ७३ धावांची भागिदारी भारतीय संघाला करून दिली. अभिषेक सिम्पालाचा एक चेंडू कट करण्याच्या नादात यष्टीरक्षक क्लासेनकडे झेल देऊन बाद झाला. त्याने १८ चेंडूंत ३६ धावा केल्या. पण, तो बाद झाल्यावर वाँडरर्स मैदानावर तिलक वर्मा आणि संजू सॅमसन यांच्या फलंदाजीचा असा अध्याय सुरू झाला जो दिवसभर सुरू राहू सकला असता. पण, षटकं संपली म्हणून नाबाद २१० धावांच्या भागिदारीवर थांबवावा लागला. दोघांना नशिबाचीही साथ मिळत होती. काही झेल सुटले. पण, दोघांनी १९ षटकार आणि १४ चौकारांची आतषबाजी करत भारतीय धावसंख्या तब्बल १ बाद २८३ वर नेली. (Ind vs SA, 4th T20)

(हेही वाचा- “मनसेच्या जाहीरनाम्यात बहिणींसाठी योजना नाही, अशा घोषणांना…”, काय म्हणाले Raj Thackeray ?)

संजू सॅमसनने ९ षटकार आणि ६ चौकारांसह ५६ चेंडूंत १०९ धावा केल्या. तर तिलक वर्माने ४७ चेंडूंत १२० धावांची आतषबाजी केली. भारतीय डावांत तब्बल २३ षटकार लागवले गेले. भारतीय डावांतील हे सर्वाधिक षटकार आहेत. तिलक वर्माचं हे सलग दुसरं टी-२० शतक. तर संजू सॅमसननेही ५ डावांमध्ये हे तिसरं शतक झळकावलं. (Ind vs SA, 4th T20)

 भारताने परदेशी भूमीतील टी-२० तील सर्वोत्तम धावसंख्याही उभी केली. याला उत्तर देताना आफ्रिकन संघाची सुरुवात मात्र चांगली झाली नाही. पहिल्याच षटकात रेझा हेनरिक्स शून्यावर बाद झाला. त्यानंतर रिकलटन, मार्करम आणि क्लासेन असे खंदे वीर झटपट बाद होत गेले. आफ्रिकन संघाची अवस्था ४ बाद १० अशी झाली. तिथेच आफ्रिकन संघाचा पराभव स्पष्ट झाला. पण. या अवस्थेतून संघाला थोडंफार सावरण्याचा प्रयत्न डेव्हिड मिलर (३६), ट्रिस्टियन स्टब्ज (४६) आणि मार्को यानसेन (नाबाद २९) यांनी केला. या तिघांच्या प्रयत्नांमुळे निदान आफ्रिकन संघ १४८ धावांपर्यंत पोहोचू शकला.  (Ind vs SA, 4th T20)

(हेही वाचा- Devendra Fadanvis यांचा मविआवर हल्लाबोल; मतांसाठी नेते उलेमाचे तळवे चाटत आहेत)

भारताकडून अर्शदीप सिंगने २० धावांत ३ बळी मिळवले. तर वरुण चक्रवर्ती आणि अक्षर पटेल यांनी प्रत्येकी दोन बळी मिळवले. भारतीय संघाने ही मालिका पूर्ण वर्चस्व राखत ३-१ ने जिंकली. तिलक वर्माला सामनावीराचा पुरस्कार मिळाला.  (Ind vs SA, 4th T20)

हेही पहा- 

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.